शरद पवारांचा धुळ्यात दौरा ; राष्ट्रवादी भवनाचे अनावरण पवारांच्या हस्ते

0
43

साईमत लाईव्ह शिरपूर प्रतिनिधी :

धुळे येथे राष्ट्रवादी भवनचे नूतनीकरण झाले आहे. त्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी शरद पवार  शनिवारी(२९जुलै) येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे. धर्मांध शक्तीविरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या कार्यक्रमातून बळ मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी सांगितले.

खासदार पवार हे नाशिकहून शनिवारी (३०जुलै) ला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी ११.३० धुळ्यात आगम होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगुज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत मल्हार बागेत असतील. तेथून नाशिकला रवाना होतील, अशा नियोजीत दौऱ्याची माहिती श्री. गोटे यांनी दिली.

 

राष्ट्रवादी भवनामधील कार्यक्रमासह खासदार पवार यांच्या स्वागतासाठी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी केले.

शिष्टमंडळात समाविष्ट होणाऱ्या सदस्यांनी आपली नावे राष्ट्रवादी भवनात द्यावीत. तेथे प्रवेशसाठी पासेस दिले जातील. पासशिवाय कोणालाही पवार भेटणार नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जमावे, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here