चोपडा : प्रतिनिधी
गोरगावले शिवारातील चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीची हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत झालेल्या महिलेचे नाव लीलाबाई बारेला असून पती संशयीत आरोपीचे नाव ग्यानसिंग बारेला असे आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरगावले शिवारातील ग्यानसिंग बारेला हा त्यांच्या पत्नी लीलाबाई बारेला यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन सतत मारहाण करत होता. दि २७ रोजी रात्री ८ वाजता पत्नीसोबत वाद होत ग्यानसिंग याने मारहाण करीत असताना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील गोरगावले शिवारात राहणारे बारेला कुटुंबीयांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच भांडण होत असे, मात्र बुधवार दि. २७ रोजी याच कारणाने बारेला कुटुंबीयांमध्ये भांडण झाले या भांडणातून पतीच्या मारहाणीत पत्नीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान , संशयीत आरोपी ग्यानसिंग बारेला हा नेहमी फिर्यादी टेम्बर्या मन्साराम बारेला (वय २३, रा.रा.धवली ता.वरला जि.बडवानी, सध्या राहणार गोरगावले शिवार, चोपडा) यांच्या सोबत लीलाबाई बारेला हिचे अनैतिक संबध असल्याचा संशयावरून सतत भांडत असे, याच चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाल्याने आरोपी याने रागाच्या भरात पत्नी लीलाबाई बारेला हिच्या डाव्याकानावर व कानाच्या मागे लोखंडी कोळपणीने वार करत तीला गंभीर दुखापत केली . दरम्यान, लीलाबाई या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत टेम्बर्या मन्साराम बारेला यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, आरोपी ग्यानसिंग बारेला हा पसार झाला आहे.
घटनास्थळी सहा पोलीस अधीक्षक ऋषिकेच रावले, पोलीस निरीक्षक देविदास मधुकर चोपडा. यांनी भेट दिली. त्यानुसार भादंवि कलम ३०२ प्रमाणे आरोपी ग्यानसिंग बारेला यांच्याविरुद्ध गुन्हा झाला आहे. पुढील तपास सहा पोलीस अधीक्षक ऋषिकेच रावले करत आहेत.