Author: Saimat

राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. राज्यपाल हे मानाचे पद आहे. त्यांनी खुर्चीचा मान ठेवावा. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. कोल्हापुरी वहान हे जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो तुम्ही लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करतात. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई (Mumbai)देशाची आर्थिक राजधानी (financial capital) म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहून कडक इशारा दिला. आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल तर उगाच काहीही बोलू नका. महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करून मराठी माणसाला डिवचू नका, असा कडक इशारा राज ठाकरे…

Read More

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. काय म्हणाले दीपक केसरकर? मुंबईच्या उभारणीत सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र यात सर्वांत मोठा वाटा आहे तो मराठी माणसाचा, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एखाद्या समाजाने मुंबईतील पैसा काढला तर मुंबईत पैसा राहणार नाही असे बोलणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नसल्याने हे वक्तव्य केले असावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.…

Read More

मोबाइल फोन अ‍ॅपच्या माध्यमातून इन्स्टंट लोन देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक तसेच कर्ज वसूल करताना छळ करणाऱ्या रॅकेटमधील १४ जणांना मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १४ कोटी रुपये आणि २.१७ लाख अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेची क्रिप्टोकरन्सी असलेली ३५० बँक खाती गोठवली आहेत. गुन्हे शाखेचे संयुक्त आयुक्त सुहास वारके यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. वारके यांनी सांगितले की, ‘या वर्षी मे महिन्यात यासंदर्भात एक तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्याने अटकेची कारवाई करण्यात आली. मोबाइल फोन अ‍ॅपद्वारे इन्स्टंट लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचा सर्व वैयक्तिक डेटा आरोपींच्या कंपनीकडे जात असे. कर्जाची परतफेड करू न शकलेल्या लोकांचा डेटा…

Read More

राज्यपालांच्या मुंबई बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 4 ट्विट करत भाजपची कानउघडनी केली आहे. महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. मराठी माणसाला आवाहन आता तरी, ऊठ मराठ्या ऊठ, शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक…

Read More

मेष- आज  तुमच्या कौटुंबिक जीवनात चढउतार येतील. तुमचे परिश्रम आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी करण्यात मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वृषभ- आज आपल्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. तुमच्या हुशारीच्या मदतीने तुम्ही कामात यश प्राप्त कराल. आज कामकाजासाठी उत्तम दिवस असेल. मिथुन- आज तुमचा दिवस चांगला सुरू होईल. कामासाठी किंवा कौटुंबिक आनंदासाठी तुमचा दिवस चांगला असेल. शुक्रवार तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण काळजी घेईल. कर्क- सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी खरिपाच्या पिक विम्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कृषी आणि महसूल यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी सोयगाव तालुक्यात दोन पिक विम्याचे प्रचार रथ रवाना करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी दिली. सोयगाव तहसील कार्यालयातून दोन्ही प्रचार रथ रवाना झाले असून तहसीलदार रमेश जसवंत व तालुका कृषी अधिकारी श्रीमती संगीता पवार, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे प्रचार रथ रवाना करण्यात आले,यावेळी नायब तहसीलदर गोरखनाथ सुरे,मंडळ कृषी अधिकारी श्री. जे.के.जाधव, एस जी वाघ , हेमंत देशमुख पिक विमा प्रतिनिधी श्री. गजानन जाधव, आदी उपस्थित होते.यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले की,राज्यात पावसाचे कमी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी एसईबीसी प्रवर्गातंर्गत लागू करण्यात आलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS आरक्षणाचा लाभही रद्द करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंदर्भातील शासनादेश (जीआर) रद्दबातल ठरवला. हा राज्यातील मराठा समाजासाठी (Maratha Reservation) मोठा धक्का मानला जात आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिकांवरील सुनावणीअंती ६ एप्रिल २०२० रोजी राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर करताना २३ डिसेंबर २०२० रोजीचा जीआर केला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील तरुणांना सरसकट मिळणारा EWS आरक्षणाचा आता मिळणार नाही. यानंतर आता मराठा समाजात काय प्रतिक्रिया उमटतात,…

Read More

औरंगाबाद : प्रतिनिधी राजकारणात पदोपदी रंग बदलणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा अनेकदा अनुभव येतो. पण सत्ता असो नसो, एकदा एखाद्या नेत्याचे नेतृत्व मान्य केले तर ते शेवटपर्यंत कायम ठेवायचे अशी उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशाच एका मनसैनिकाने ‘मी स्वतःला आपणास अर्पण करत आहे’ असे चक्क शपथपत्राद्वारे लिहून दिले आहे. राज ठाकरे एक उत्तम राजकारणी, प्रभावी वक्ते म्हणून देशाला परिचित आहेत. स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडूण आणत राज ठाकरे यांनी आपले कर्तुत्व सिध्द केले होतेच. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेच्या उमेदवारांनी लाखांच्यावर मते घेत आपले…

Read More

औरंगाबादः प्रतिनिधी राज्यात शिवसेनेशी(Shivsena) बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली. यानंतर शिंदे यांच्या दिल्लीवारीचे प्रमाण वाढले. यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Demons) मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा असा बाणा नाही. भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना चोरून काम करावं लागत. ते लपून छपून दिल्लीत जातात. पण शिवसेनेत (Shivsena) सगळं ओपन होते,अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. राज्यात शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. सध्याचे मंत्रिमंडळ दोनच लोकांचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात विनोद होत…

Read More