Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यातच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना नेमकी कुणाची असा वाद सुरु आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यातच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी याच मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. शिवसेना कुणाचा पक्ष आहे , हा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते . बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसे त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते…

Read More

मेष- मंगल कार्यांसाठी शुक्रवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे. वृषभ-  नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल. मिथुन- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल. कर्क-  शिक्षण घेण्याऱ्यांसाठी शुक्रवार…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगर कठोरा शिवारात शेतात एका तरूण शेतमजुराने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे . या संदर्भात मिळlलेली माहीती अशी की प्रदीप विजय भंगाळे वय 37 राहणार सांगवी बु॥ तालुका यावल हा डोंगर कठोरा क्षेत्रातील धुळे शिवारातील चेतन प्रकाश पाटील यांच्या शेतात राहुन शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उर्दरर्निर्वाह करणाऱ्या तरूणाने आज दि.28जुलै गुरूवार रोजी सकाळी 7वाजेच्या सुमारास त्याचे सोबत कामास असलेले वडील विजय भंगाळे हे त्यास भेटुन घराकडे निघाले असता त्यांने शेतातील पत्र्याच्या शेड खोलीत छताच्या लोखंडी पाईपास रूमाल बांधुन गळफास घेत आत्महत्या केली.त्याच्या सोबत कामास त्याचे वडील व मजुर कामास होते त्याच्या निर्दशनात ही…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील दहिगाव येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला या घटनेत एका संशहीतास पोलिसांनी अटक केली आहे.घटनेचे वृत्त करतात घटनास्थळी डीवायएसपी,पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह हजर होऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँक चे एटीएम आज रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला हा प्रकार 27 चे रात्री घडला दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले त्यानुसार त्वरित…

Read More

बुलडाणा : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडाळीनंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला. मात्र बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)यांच्यासह दोन आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु जिल्ह्यात एवढी मोठी उलथापालथ झाली असताना खासदार जाधव यांचे धाकटेबंधू, माजी नगराध्यक्ष संजय जाधव(Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा वाढदिवस सगळीकडे फलक लाऊन आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन धुमधडाक्यात साजरा केला. त्यामुळे ही घडामोड प्रताप जाधव यांना हादरा देणारी समजायची की गनिमी कावा खेळून दोन्ही सेना आपल्या कुटुंबात ठेवायची? अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. तसेच…

Read More

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी संबोधले. यानंतर गुरुवारी भाजपच्या महिला खासदारांनी या विधानावरून सभागृहात गदारोळ केला. हातात सोनियांमागे पोस्टर घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. सोनिया गांधींना माफी मागावी लागेल, असे स्मृती इराणी म्हणाल्या. लोकसभा आणि राज्यसभेतील गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. या गदारोळात अधीर रंजन यांनी गुरुवारी संसदेबाहेर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्याने माफी मागण्यास नकार दिला, पण म्हणाला- चुकून मी मुर्मूला राष्ट्रपत्नी म्हटले, आता तुम्हाला मला फाशी द्यायची असेल तर द्या. सत्ताधारी पक्ष तीळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. स्मृती सभागृहात म्हणाल्या- काँग्रेस गरीब आणि आदिवासी विरोधी आहे. आपल्या चुकीबद्दल माफी मागण्याऐवजी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी संस्कृती मंत्रालय वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभर उत्सव ठरायला हवा याच अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे शहरासह नागरिकांचा सहभागाचे संयोजक जिल्हाधिकारी अभिजित राऊत ‘हर घर तिरंगा’ अभियानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते सागर कुटुंबळे, रोहित कुटुंबळे, ललित कोतवाल यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ फ्रेम देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वेदांत नाईक, तन्मय राणे, निरंजन राणे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की , आपल्या शहरामध्ये आपण ज्या घरामध्ये वास्तव्य करत आहात अशा आपल्या घरावर दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा उभारून भारताच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘हर घर तिरंगा’…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी येथील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामासाठी होत असलेल्या मोजणीस अतिक्रमण धारकांनी सदर बाब न्यायालयात दाखल असल्याने त्या वर निर्णय येई पर्यंत स्थगित ठेवावी अशी मागणी  करत विरोध केला होता . मात्र  बराच वेळ वाद झाल्यावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास मोजणी कामास सुरवात झाली. बोदवड शहरातून महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून बांधल्या जाणारा रस्ता अतिक्रमित दुकानांच्या प्रश्नामुळे रखडलाय त्या मुळे जनतेस त्रास भोगावा लागतोय. मात्र अतिक्रमण काढतांना भेदभाव केला जात असल्याच्या प्रश्नावरून धारक उच्च न्यायालयात गेले आहेत. असे असतांना एका बाजूच्या दुकानदारांना मोजणीच्या नोटीस मिळाल्यावर त्यांनी लेखी हरकत नोंदवली होती. तरी सुद्धा मोजणीस सुरवात झाल्याने…

Read More

IND vs WI, 3rd ODI : टीम इंडियाने  एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा  पराभव  केला आहे. भारताने वनडे मालिका  ३-० ने जिंकली . भारतीय संघ  39 वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे आणि त्यांनी प्रथमच कॅरेबियन संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप  केला आहे. भारताने  तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात  वेस्ट इंडिजचा  119 धावांनी पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने  डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजसमोर 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26 षटकांत 137 धावांत गारद झाला. ब्रँडन किंग  आणि निकोलस पूरन  यांनी त्यांच्या संघाप्रमाणे सर्वाधिक 42-42 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून युजवेंद्र…

Read More