Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   ओबीसींना आरक्षण देण्यात शिवसेनेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेला ओबीसींना आरक्षण देता आलं नाही, असाही शिवसेनेवर आरोप होत आहे. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेवरील हे आरोप सेनेला खोडता येणार आहेत. पुणे : शिवसेनेत आमदार आणि खासदारांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेचं (shivsena) काय होणार? असा सवाल केला जात होता. मात्र, इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्याच आठवड्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद देण्यात…

Read More

मेष- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे. वृषभ- अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. मिथुन- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेण्यामध्ये घाई करू नका. वेळेला महत्त्व द्या. कर्क- सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा. सिंह- कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले तुषार सावंत यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने तुषार सावंत यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव महानगराध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले संदीप पाटील यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने संदीप पाटील यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील निंबादेवी, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे अचानक झालेल्या गर्दीमुळे सुरक्षेचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश देत जवळपास सर्वच पर्यटन स्थळांवर बंदी लावली आहे. सदरची बंदी लवकरात लवकर हटवून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव महानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, निंबादेवी यावल, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे झालेल्या गर्दीमुळे तसेच जिवीत हानीचा विचार करता जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचा आदेश दिला होता. तो निर्णय त्यावेळी योग्यही होता मात्र आता मनसेकडे ही बंदी उठवावी म्हणून नागरीकांनी निवेदन दिले आहे त्या आधारे आम्ही जिल्हाधिकार्‍यांना नागरीकांच्या वतीने विनंती करतो आहे की, जिल्ह्यातील नागरीकांना…

Read More

पुणे : प्रतिनीधी अभिनेता सुबोध भावे हे नेहमीच स्पष्टवक्ता म्हणून चर्चेत राहतात. देशातील अनेक मुद्द्यांवर ते मत मांडतात. आताच्या राजकीय परिस्थितीवरसुद्धा त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हातात देशाचा कारभार दिला आहे. आपण सर्वजण फक्त चांगले शिक्षण आणि नोकरी मिळवून परदेशात स्थायिक व्हायचा विचार करत असतो, अशी टीकाही सुबोध भावे यांनी केली आहे. पुण्यामध्ये डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सुबोध भावे पुढे बोलतांना म्हणाले की, आपण सर्वजण चांगले शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत असतो. चांगली नोकरी मिळवून परदेशी जाऊन स्थायिक…

Read More

यावल : तालुका प्रतिनीधी रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने जळगाव जिल्हास्तरीय यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह संस्था चालकांचे दुर्लक्ष झाले आहे का?याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह आदिवासी क्षेत्रात राजकारणात आणि समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जळगाव जिल्ह्यातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधांबाबत नाशिक आदिवासी विभागीय स्तरावरून सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्याची मागणी संपूर्ण आदिवासी विभागातून होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या जिल्हास्तरीय कार्यालया अंतर्गत असलेल्या रावेर तालुक्यातील रसलपुर येथील अनुदानित आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्यांची अचानक तब्येत बिघडून…

Read More

साईमत लाईव्ह दिल्ली वृत्तसंस्था  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नॅश्नल हेराल्डच्या दिल्ली स्थित कार्यालयासह 10 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. ईडीने नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे, असे दिव्य मराठीचे रिपोर्टर वैभव पळनीटकर यांनी सांगितले आहे. 3 दिवसांत सोनियांची 12 तास चौकशी, 5 दिवसांचा ब्रेकही मिळाला सोनिया गांधी 21 जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. तिथे त्यांची 3 तास चौकशी झाली. त्यानंतर 5 दिवसांच्या ब्रेकनंतर 26 जुलै रोजी त्यांची सलग 6 तास चौकशी करण्यात आली. ईडीने गत बुधवारीही सोनियांना चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हाही त्यांची 3 तास चौकशी झाली. एकूण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सामोरे जाण्यासाठी एक बुथ टेन युथ प्रत्येक गावात राबवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग बाबुराव पाटील( राजू सर ) यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्यासमवेत विधानसभा क्षेत्र जळगाव शहर प्रमुख लिलाधर तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जळगाव ग्रामीण पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, दिलीप चव्हाण, प्रा.राजूसर, योगराज सपकाळे, हेमंत पाटील. संजू पाटील. विलास सोनवणे, उमेश पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक भिवा सोनवणे, युवक अध्यक्ष जळगाव विनायक चव्हाण, युवक उपाध्यक्ष जळगाव तालुका चेतन कोळी, धनराज पाटील सावखेडा खू।। आदी उपस्थित होते. याबद्दल त्यांचे उमाळे येथील सरपंच संगीता…

Read More