साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील संभाजीनगर भागातील रहिवासी विवेकानंद राजाराम दिवाण (वय 49) हे 1 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले आहेत.सोमवारी सकाळी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेले होते.त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला पण ते मिळून आलेले नाहीत.त्यांच्या जवळ पॅशन प्रो. ब्रॅडची एम.एच.19 ए यू 6667 ही मोटारसायकल देखील आहे.त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्योती दिवाण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील सर्वच बगीचे सकाळ सत्र व संध्याकाळ सत्र अशा मर्यादित वेळे पुरतेच खुली असल्याने दिवसभरात शहरातील व शहराबाहेरील येणाऱ्या लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करता पूर्णपणे गैरसोयीचे आहे. शहरात मोठ्या स्वरुपात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची संख्या खूप मोठी आहे. त्याच प्रमाणे शहरातील बाजारपेठांसाठी बाहेर गावाहून येणारी ग्राहक, कोर्ट/शासकीय कामानिमित्त येणारी लोक, विद्यार्थी यांच्यासाठी विसावा, जेवणासाठी कुठलीही अधिकृत पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते, त्यासाठी शहरातील बगीचे सुरक्षारक्षक नेमून दिवसभर खुली ठेवणे गरजेचे आहे. रमाई फाउंडेशन, जळगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने या मागणीच्या आशयाचे निवेदन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.जयश्री महाजन यांना…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी: शिवसेनेतील तब्बल ४० आमदार (MLA) आणि एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकार पाडलं. ज्यानंतर शिंदेंनी भाजपच्या (BJP) सोबत युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकारच बेकायदेशीर असल्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे. काल या याचिकेवर बराच वेळ सुनावणी झाली. पण ही सुनावणी काल पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज (४ ऑगस्ट) पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी नेमकं काय घडलं याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निकाल येईपर्यंत घेऊ नका. ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे द्यायची की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी पार पडणार असं सुप्रीम…
फैजपूर l प्रतिनिधी शेतात निंदनीचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने आमोदे गावावर शोककळा पसरली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता घडली. आमोदे तालुका यावल येथील शेतकरी ज्ञानदेव धनु चौधरी (वय -५५ ) हे आपल्या वडिलांसमवेत शेतामध्ये ज्वारी निंदणीचे काम करीत होते. त्यांच्या मदतीसाठी त्यांची फैजपूर येथील बहिण मालती तोताराम चौधरी या सुद्धा त्यांना मदत म्हणून निंदणी साठी शेतात आल्या होत्या. दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यावेळी शेतातील काम सोडून बांध्यावर ज्ञानदेव चौधरी हे आंब्याच्या झाडाखाली तर त्यांचे वडील गवताने भरलेल्या बैलगाडी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी हमिदा बानो या २० वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या, पण एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला आहे. हमिदा बानो २० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला नोकरी करण्यासाठी गेल्या आणि परत आल्याच नाहीत. २० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला गेलेली ५० वर्षाय महिला पाकिस्तानात सापडली आहे. हमीदा बानो असं या महिलेचे नाव असून ती मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होती. हमीदा बानो यांना भारतात आणण्याचे प्रयत्न त्यांचे कुटुंबीय करत आहेत. पाकिस्तानी युट्यूबर्सच्या व्हिडिओमुळं हमीदा बानो यांच्याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवरुन संवादही साधला होता. आता हमीदा यांना भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र, त्यांच्याजवळ पासपोर्ट व पैसे…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. राज्यात अधिवेशन बोलावणं, नव्या विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करणं या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत. त्यालाच आम्ही कोर्टात आव्हान दिलं असून कोर्ट आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या (bjp) पटलावरील छोटसं प्यादं आहे.…
साईमत लाईव्ह दिल्ली प्रतिनिधी आता लवकरच सॅटलाईटद्वारे टोलवसूल केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. वाहनाच्या नंबर प्लेटच्या मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर सध्या काम सुरू असल्याचे रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची आवश्यकता भासणार नसल्याचे देखील गडकरी म्हणाले आहेत.ते बुधवारी राज्यसभेत बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, अनेकदा टोल चुकवला जातो, त्यामुळे मोठे नुकसान होते, मात्र या अत्याधुनिक सॅटलाईट यंत्रनेच्या माध्यमातून टोल वसुलीमुळे टोल चुकवेगिरीला चाप बसेल. जर तुम्ही टोल चुकवला तर त्यासाठी कायद्यात कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे सरकारचा टोलवसुली धोरणामध्ये अत्याधुनिकता…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी छगन भुजबळांना 2 वर्ष एक महिना आणि 21 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. आज राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे. राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी राऊत यांची तब्बल 16 तास…
मेष- दुपारनंतर वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा मुद्दा कोणावरही जबरदस्ती लादू नका. वृषभ- तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे. मिथुन- खोट्या गोष्टींचा आज अवलंब करू नका. बाहेर जाताना गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा. कर्क- तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे. सिंह- आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा. कन्या- नोकरीसाठी अर्ज करणं लाभदायक ठरेल. महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करा. तूळ- तुमच्या नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात.…
सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालायाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी आजच याचिका दुरुस्ती करून द्याल का? तुमचे नेमके म्हणणे काय ते मी लिहून घेऊ का? अशी टिप्पणीही केली, राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तिवाद झाल्यानंतर ही सुनावणी पुन्हा उद्यावर ढकलण्यात आली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. उद्या सुनावणीसाठीचे हे पहिलेच प्रकरण असेल. आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला तर राज्याचे महाधिवक्ता तुषार…