रसलपूर येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

0
3

यावल : तालुका प्रतिनीधी
रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने जळगाव जिल्हास्तरीय यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह संस्था चालकांचे दुर्लक्ष झाले आहे का?याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह आदिवासी क्षेत्रात राजकारणात आणि समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जळगाव जिल्ह्यातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधांबाबत नाशिक आदिवासी विभागीय स्तरावरून सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करण्याची मागणी संपूर्ण आदिवासी विभागातून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या जिल्हास्तरीय कार्यालया अंतर्गत असलेल्या रावेर तालुक्यातील रसलपुर येथील अनुदानित आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्यांची अचानक तब्येत बिघडून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.1ऑगस्ट सोमवार रोजी उघडकीस आली.
रुपेश आत्माराम बारेला वय 9 रा.अहिरवाडी ता.रावेर या विद्यार्थ्याचे गेल्या 3 वर्षांपासून रसलपूर येथील निवासी आश्रमशाळेत शिक्षण सुरु होते. यावर्षी तो इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत होता.काल दि.1 ऑगस्ट 2022 रोजी त्यांने सकाळी अंघोळ केल्यानंतर रुपेशला काही वेळाने उलटी व जुलाब सारखे होऊ लागले. त्यानंतर त्याची अचानक तब्येत बिघडत गेली, त्यात त्याला अचानक झटके येत असल्याने रुपेशला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते अशी माहीती आश्रमशाळेचे अधीक्षक यांनी दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार व परिसरातील चर्चेनुसार रुपेशला जर आधीपासून फिट येत असतील तर त्याला गेल्या तीन वर्षात किती वेळा फिट येण्याचा त्रास झाला?आणि फिट येण्याचा त्रास झाला असेल तर संस्थाचालकांनी तसेच आश्रम शाळेचे अधीक्षक यांच्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्फत रसलपुर या अनुदानित आश्रम शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काय दखल घेतली?आणि काय कारवाई केली?त्याला याआधी आश्रम शाळेमार्फत काही औषधोपचार करण्यात आला आहे का? किंवा त्याला अचानक त्रास सुरू झाला तसेच आदिवासी अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टिकोनातून सुख सुविधा व आरोग्याबाबत शासकीय नियमानुसार दखल घेतली जात नाही का ?असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रावेर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. जळगावात आणत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला अशी माहिती आश्रम शाळेचे अधीक्षक विजय पाटील यांनी दिली जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल असता त्याला तपासून CMO डॉ.प्राची सुरतवाला यांनी त्यास मयत घोषित केले.रुपेश बारेला याच्या पश्चात आई वडील,लहान भाऊ असा परिवार आहे. रुपेशचे वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक दृष्ट्या पाहता या विद्यार्थ्याला फिट आल्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्यातच रुपेशचा मृत्यू झाला,या बाबत रावेर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रावेर पोलिसांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व अटी शर्तीनुसार आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना आता पर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक सुख सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत किंवा नाही..? याची दैनंदिनी तपासणी केल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा संपूर्ण आदिवासी क्षेत्रात बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here