Author: Saimat

जळगाव : प्रतिनीधी शहरातील नवल कॉलनीतील रहिवासी आरती रवींद्र हंसकर (वय 35 ) यांचे आज दि २ ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5 वाजता नवल कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्या अशोक मुंशीजी हसंकर यांच्या सुन तर साईमतचे छायाचित्रकार भुषण हसंकर यांच्या वहीनी होत.

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा तालुक्यात गेल्या २ वर्षांपासून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मंजूर झालेल्या पाचोरा तालुक्यातील सुतगीरणीसाठी पहिला हप्ता ४० कोटी रुपये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंजूर करण्यात आला असून लवकरच तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी २० एकर जागा घेऊन सुतगिरणीचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी शेतकरी सभासदांची अडीच कोटी रुपये वर्गणी जमा झालेली आहे. भडगाव तालुक्यासाठी स्वतंत्र अशी सूतगिरणी उभारण्यासाठी मुख्यमंत्री यांनी हिरवा कंदील दिल्याने प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या चिंतामणी कॉलनीतील “शिवालय” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मा. उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, मा. नगराध्यक्ष संजय…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे दयाराम नारायण चौधरी वय 60 यांनी आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास उत्तम महादू चौधरी यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांना ८ वाजेच्या सुमारास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळूखे यांनी मुत्यु घोषणा केले , आत्महत्या केल्याची कारण समजू शकले नाही,त्याच्या परिवारात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे, असा परिवार आहे.

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. आर. सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून 35 मुलं व 35 मुली असे मिळून एकूण 70 विद्यार्थ्यांना गणवेश दिले. शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री प्रमोद गरुड सर गणवेश वाटपाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय जीवनातील शिक्षणाच्या संधीचा सदुपयोग करून यशस्वी भविष्याकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येऊ शकते याबद्दल अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एन. पाटील यांनी केले. श्री एन. एन. पाटील व श्री वाय. बी. परदेशी यांनी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  माझ्या मनातही आले नव्हते पण, भाजपच्याच एका नेत्याने मला सांगितले की, हे सरकार एक दुजे के लिये सरकार आहे. राज्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, पण प्रत्येक खात्याला ऑन फिल्ड मंत्री नाही हे दुर्दैव आहे, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली. लढणाऱ्या लेकींचा सार्थ अभिमान सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था चांगलीच व्हावी, ही अपेक्षा होती त्यामुळे सुदृढ चर्चा व्हावी असे वाटते. देशाची काय परिस्थिती आहे त्यात सुधारणा करता येईल का? यावर विचार करत आहे. मविआतील तीन नेत्यांवर कारवाया झाल्या आहेत. या तिन्ही केसेसनंतर त्यांच्या कुटुंबीयातील…

Read More

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी मलकापूर थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मलकापूर येथे निघालेल्या भव्य रॅलीला संबोधित करतांना व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतांना मलकापूर आमदार राजेश एकडे संबोधित करताना म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून शोषितांचा आक्रोश आपल्या शब्दातून मांडून समाज जागृती केली. म्हणतात की कडकडे डफावर थाप तू शोषितांचा मायबाप तू .हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस असे असंख्य विचार त्यांनी समस्त भारतीयांना दिलेत. अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव… अशा या समाज सुधारक थोर पुरुषाला…

Read More

शिवसेनेची बुलंद तोफ मानल्या जाणाऱ्या खा. संजय राऊतांना रविवारी कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. त्यानंतर कोट्राने त्यांना 4 आठवड्यांपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी सगळे दिवस सारखेच नसतात असे नमूद करत भाजप व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर आता थेट काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट करून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. काय म्हणाले राहुल गांधी? राहुल गांधी यांनी रविवारी रात्री संजय राऊतांना ईडीने अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्विट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘राजाचा…

Read More

संजय राऊतांच्या घरात ईडीचे पथक घुसले. त्यांना अटक झाली. अशा तपास यंत्रणांची झुंडशाही आणि दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे हे शेवटचे टोक आहे. सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात करण्यात आला. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो अशी टीकाही करण्यात आली. तुरुंगही कमी पडतील महाराष्ट्रावर एकापाठोपाठ घाव घातले जात असून महाराष्ट्र तोडण्याआधी शिवसेनेला संपवायलाच हवे. त्यासाठी तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची, महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. संजय राऊतांसारखे…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या तोफा आज पुण्यात धडाडणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही संध्याकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते 1.20 दरम्यान फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 2.15 ला ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे…

Read More

मेष : आजचा दिवस व्यस्त असेल. वाहन सावकाश चालवा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींकडून सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. वृषभ: कुटुंबातील वाद कमी होतील. स्वतःच्या वाणीवर संयम ठेवा. घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.  मिथुन : चंचलता वाढेल. काम वेळेत पूर्ण करा. मित्रांची मदत करा. आज तुम्हाला तुमच्या कंपनीला मोठ्या ठिकाणी रिप्रेजेन्ट करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नाराज असलेल्यांची समज काढाल. मान सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे. कर्क : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार…

Read More