Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची काच फुटली आहे. पण अशा गोष्टींकडे लक्ष न देता उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत करावे असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. सामंत यांनी आपल्या मतदारसंघात तर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिल्यास असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींना अधिकचे महत्वही मिळणार नसल्याचे कदम म्हणाले आहेत. मुंबई : बंडखोर आमदारांबाबत (Shiv sena) शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कोणी प्रतिक्रिया देत नसले तरी (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर मात्र खोचक टिका केली आहे.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे मी आधीच बोलो होतो. हे परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर झेंडा रोवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावरील हल्लाबोल अजूनही सुरूच आहे. मुंबईतील शाखांच्या उद्घाटनाचा प्रसंग असो, वाढदिवसाचा प्रसंग असो की शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक असो, संधी मिळताच उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. आजही त्यांनी एका कार्यक्रमातून त्यांनी बंडखोरांची पिसे काढली. भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडिमेड आहेत. हायब्रीड…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या भवितव्यावर सर्वोच्च सुनावणी सुरु असून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी चालू आहे. सुनावणीदरम्यान पक्ष फुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला आहे. आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडत आहेत तर शिंदे गटाकडून हरिश साळवे हे युक्तिवाद करीत आहेत.आमदार अपाज्ञ प्रकरणाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूकडील वकीलांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना काही प्रश्‍नही विचारले. दुपारी दिड वाजता आजचा युक्तीवाद संपल्यानंतर या प्रकरणी आता उद्या सुनावणी होईल, असे कोर्टाने घोषित केले. त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील वरखेडी येथील एका अविवाहित अल्पभूधारक २८ वर्षीय युवकाचा त्यांचेच शेतात पिकाला फवारणी करत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेडी ता. पाचोरा येथील अविनाश अशोक भोई (वय – २८) यांची वरखेडी शिवारात एक एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे दि. ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करत असतांना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतांनाच दि. १…

Read More

जळगाव : प्रतिनीधी आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असतांना आयुष्यातील आनंदही अनुभवावा असे प्रतिपादन जी. एच रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी असलेले भाग्येश त्रिपाठी यांनी केले. यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमाअंतर्गत भाग्येश त्रिपाठी हे कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन विभागाच्या विध्यार्थ्यांशी बोलत होते. श्री. त्रिपाठी हे सध्या मुंबई येथील वेअरसिटीज या कंपनीत सायबर सेक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सायबर सेक्युरिटी अॅनालिस्ट या क्षेत्रातील विविध संधी, त्यांची…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगावातून रेल्वेने सुरत येथून मुंबई जाण्यासाठी निघालेला १४ वर्षीय मुलगा चुकीने हिस्सार सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी मुंबई येथे जात नसल्याची माहिती त्याला काही लोकांनी दिली. त्यामुळे हा मुलगा १ अाॅगस्ट राेजी जळगाव स्थानकावर उतरला. दरम्यान, भेदरलेल्या अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर तो फिरत होता. यावेळी सिद्धार्थ वाघ या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने मुलाची विचारपूस केली. त्यानंतर वाघ यांनी मुलाच्या वडिलांना संपर्क साधून पालकांच्या स्वाधीन केले. अहमद अलीम अन्सारी (वय १४, रा. बोरिवली ईस्ट, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. अहमद हा २७ जुलै रोजी सुरत येथे आजीकडे गेला होता. १ ऑगस्ट रोजी तो पुन्हा मुंबईला येण्यासाठी निघाला.…

Read More

यावल : प्रतिनिधी शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाचे ऑडिट करण्याचे निर्दश शासनाने दिले आहे मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ शाखा यावल यांच्यातर्फे सुद्धा विरोध नोंदविण्यात आला. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ यावल शाखा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाच्या ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे  मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या कामामुळे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी   प्रत्येक गावातील पोलीस पाटील हे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते आणि आहे,परंतु आता प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांनी आप-आपल्या गावात ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास सुरू असलेल्या घटनांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लावता येईल अशा सूचना वजा नम्रपणे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत केल्याने पोलिसांचा आता चौथा डोळा सक्रिय होणार गुन्ह्यांच्या कामात तात्काळ चौकशी तपास केला जाऊन गुन्हेगार तात्काळ पकडले जाणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मुळे एखादी गावात ठराविक ठिकाणी घटना घडल्यास आरोपीचा गुन्हेगाराचा शोध लावण्याकामी मोठा पुरावा आपल्या हाती लागेल.आतापर्यंत पोलिसांना प्रत्येक…

Read More

जळगाव: महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते कवी मिथुन गौतम ढिवरे यांच्या ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आयुक्त सभागृहामध्ये आज करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी “नवोदित कवी आणि लेखक यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून समाजाची सेवा करावी” अशा भावना आयुक्त मॅडम यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र जाधव होते. अध्यक्षीय भाषणामध्ये शैलेंद्र जाधव यांनी ‘हरवलेला काळ’ या काव्यसंग्रहाबद्दल सविस्तर विवेचन केले आणि ‘हरवलेला काळ’ यामध्ये असलेल्या कविता आजच्या काळाला किती तंतोतंत लागू पडतात याबद्दल सांगितले. कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे खिरोदा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव त्र्यंबकराव भुकन यांचा विशेष सत्कार आयुक्त विद्या…

Read More