साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले तुषार सावंत यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने तुषार सावंत यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले.
या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.