लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हातात देश

0
3

पुणे : प्रतिनीधी
अभिनेता सुबोध भावे हे नेहमीच स्पष्टवक्ता म्हणून चर्चेत राहतात. देशातील अनेक मुद्द्यांवर ते मत मांडतात. आताच्या राजकीय परिस्थितीवरसुद्धा त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. ज्यांची लायकी नाही त्यांच्या हातात देशाचा कारभार दिला आहे. आपण सर्वजण फक्त चांगले शिक्षण आणि नोकरी मिळवून परदेशात स्थायिक व्हायचा विचार करत असतो, अशी टीकाही सुबोध भावे यांनी केली आहे.
पुण्यामध्ये डीईएस प्री प्रायमरी स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
सुबोध भावे पुढे बोलतांना म्हणाले की, आपण सर्वजण चांगले शिक्षण घेऊन सतत करियरच्या मागे धावत असतो. चांगली नोकरी मिळवून परदेशी जाऊन स्थायिक होण्याचा विचार सर्वजण करत असतात. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशा लोकांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हे राजकारणी आपल्या देशाचा विचार करतील असे आपल्याला वाटते. पण त्यांनी जे काही करून ठेवले ते आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. स्वातंत्र्याअगोदरच्या काळात टिळक आणि आगरकर ज्या पद्धतीने देशाचा विचार करायचे तसा विचार आताचे राजकारणी करत नाहीत, असे म्हणत सुबोध भावे यांनी देशातील राजकारणी आणि राजकारणावर टीका केली आहे. देश निर्मितीसाठी पुढील पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, असे मतही त्यांनी बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here