Author: Saimat

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.एस. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव मध्ये ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर हे होते तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे हे उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभागाध्यक्षा डॉ. सुनिता एन. कावळे यांनी केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी कहानी, कविता, विविध गीत सादर केले. अध्यक्ष डॉ.एम. व्ही. बिल्दीकर सरांनी हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपण प्रयत्नरत राहिले पाहिजे तसेच हिंदी भाषेचे महत्व, उपयोग व व्याप्ती विशद केली. तर काटे सरांनी हिंदी विषयाचे महत्त्व विशद…

Read More

साईमत लाईव्ह कळंब प्रतिनिधी:- अजित चव्हाण कळंब:- मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा एकदा मराठवाड्याच्या भूमीतूनच सुरु झाला आहे. कळंब येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले. कळंब येथील विद्या भवन हायस्कूलचे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चाचा प्रवास झाला. आजपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी झुलवत ठेवले आहे. समाज हक्‍काच्या आरक्षणासाठी लढा सुरूच आहे, मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला सैवेधानिक आरक्षण द्यावे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी शहरात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. महिलांकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या एका महिलेसह हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल सरिता’मध्ये हॉटेल चालक महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास हॉटेल सरितावर छापा टाकला. हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये चार प्रौढ मिहिला आढळुन आल्या. महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक एक ४९ वर्षीय महिलाअसून तीने त्या चार महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगीक…

Read More

साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी :  राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काही जण टीका करत आहेत. त्यांच्या टिकेले प्रतिटिकेने नव्हे तर कामातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिनांक २० रोजीच्या जिल्हा दौर्‍याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाळधी येथील नियोजीत विश्रामगृहाचे भूमिपुजन करणार असून त्यांच्याच हस्ते महात्मा गांधी चौकात रिमोट कंट्रोलने तब्बल २२ कोटी रूपयांच्या आणि सौर उर्जेवर चालणार्‍या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कार्यकर्त्यांनी विरोधकांसोबत कोणतीही तडजोड…

Read More

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी : युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक श्री. भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासुन सुरू केले आहे. याबाबत सविस्तर असे की, शेतकरी योगेश रामलाल पुरभे रा. मोठा माळी वाडा, धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगांव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. व जे काही पीक हाती आले ते नाईलाजास्तव कमी दराने…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावच्या गायत्री ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावत ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. गायत्री च्या या यश्या मुळे जळगावच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे येथील मृणाल एंटरटेनमेंट आणि ग्रुमिंग आयोजित ही स्पर्धा फक्त सौंदर्य स्पर्धा नसून, यात इतर शरीर सौंदर्याच्या किंवा ग्लॅमरस , फॅशन स्पर्धांपेक्षा वेगळेपण आहे. त्यात भारतीय पुरातन वारसा जपणे हे मुख्य उद्देश आहे. मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून उभी राहिलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. गायत्रीने अजिंठ्याची प्रतिकृती बनून त्याबद्दल माहिती आणि लावणी विषयी सध्याचे समज गैरसमज याविषयीचे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तहसील कार्यालय व यावल पोलीस स्टेशन कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर एक जण आपल्या निवासस्थानी घरगुती वापराच्या गॅस हंड्यांचा साठा करून चार चाकी वाहनांमध्ये तो गॅस भरून दर महिन्याला लाखो रुपयाची उलाढाल करीत आहे याकडे मात्र यावल तहसीलदार,पुरवठा विभाग, यावल पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चार चाकी वाहनधारक चालक-मालक यांच्याकडून केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गॅसवर चालणाऱ्या चार चाकी वाहनात एक घरगुती वापराची गॅस हंडी चार चाकी वाहनात भरून देण्यासाठी एक जण चार चाकी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे बेकायदा आणि कोणतेही पावती वगैरे न देता 1150 ते 1200 घेऊन आपली चांदी आणि कमाई करून…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी हजारो भाविकांचे,भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या यांच्या श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. सोमवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबार सकाळी सात वाजता आरती,आठ वाजता सेवा,दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी बारा वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री आठ वाजता महाआरती व रात्रभर ठिक- ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे. मनवेल ग्रामपंचायत मार्फत व गावकरी आपआपल्या भागात स्वच्छता मोहीम राबवून…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी यवतमाळ : 17 वर्षांची वैष्णवी. यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून तिला उपचारासाठी नागपुरात (Nagpur death) आणलं. वैष्णवीची मृत्यूशी झु्ंज सुरु होती. प्रकृती खालावत गेली. तातडीनं तिला व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं. 17 वर्षांच्या वैष्णवीचा आईवडिलांसमोरच तडफडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित…

Read More

तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कुठून येते? तुम्ही म्हणाल की तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरची सेवा घेतली आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या जागी टॉवर आहेत जिथून तुम्हाला नेटवर्क मिळते. जेथे टॉवर नाहीत किंवा दूर आहेत, तेथे नेटवर्क कमी आहेत. उदाहरणार्थ, जंगल इ. आता टॉवरऐवजी थेट उपग्रहावरून इंटरनेट कसे मिळते. असे झाले तर जंगल असो की तळघर, इंटरनेटचा वेग कुठेही कमी होणार नाही. स्टारलिंक अशीच सेवा देते. (world’s fastest Internet star link-Elon Musk) स्पेस एक्स ही इलॉन मस्क ची कंपनी आहे. स्टारलिंग हे स्पेस एक्स द्वारे संचालित उपग्रह इंटरनेट ‘नक्षत्र’ आहे. स्टारलिंक ४० देशांमध्ये उपग्रह इंटरनेट प्रवेश प्रदान करते. स्पेस एक्स ने २०१९ मध्ये स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित…

Read More