घरगुती वापराचा गॅस चार चाकी वाहनात यावल तहसीलदासह पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

0
3

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

यावल तहसील कार्यालय व यावल पोलीस स्टेशन कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर एक जण आपल्या निवासस्थानी घरगुती वापराच्या गॅस हंड्यांचा साठा करून चार चाकी वाहनांमध्ये तो गॅस भरून दर महिन्याला लाखो रुपयाची उलाढाल करीत आहे याकडे मात्र यावल तहसीलदार,पुरवठा विभाग, यावल पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चार चाकी वाहनधारक चालक-मालक यांच्याकडून केला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गॅसवर चालणाऱ्या चार चाकी वाहनात एक घरगुती वापराची गॅस हंडी चार चाकी वाहनात भरून देण्यासाठी एक जण चार चाकी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे बेकायदा आणि कोणतेही पावती वगैरे न देता 1150 ते 1200 घेऊन आपली चांदी आणि कमाई करून घेत आहे, विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून चार चाकी वाहनात घरगुती वापराचा गॅस सर्रासपणे सर्व स्तरातील वाहन चालक मालक भरून आपली वाहने चालवीत आहे हे सर्व,सर्व स्तरातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह वाहन मालकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.

वाहन चालका जवळ स्वतःची घरगुती वापराची गॅस हंडी असल्यास तो गॅस त्या ठिकाणी भरून देण्यासाठी पन्नास रुपये मजुरी,आणि घरगुती वापराची गॅस हंडी गॅस भरणाऱ्या कडूनच विकत घेतल्यास अकराशे पन्नास ते बाराशे रुपये घेऊन कोणतीही पावती न देता,आणि दुकान परवाना नसताना बेकायदा बिंनदिक्क़त पणे सर्रासपणे व्यवसाय सुरू आहे.

या प्रमाणे यावल तालुक्यात 75 टक्के व्यवसायाच्या ठिकाणी आणि वाहनांमध्ये सर्रासपणे घरगुती वापराचा गॅस वापरला जात आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना संबंधित गॅस एजन्सी चालक,मालक आणि गॅस हंडी ग्राहकांपर्यंत पोहोच करणारे गॅस एजन्सीचे संबंधित मजूर,कर्मचारी समन्वय साधून काळ्या बाजारात घरगुती वापराचा गॅस विक्री करतात कसे?हा मोठा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध गॅस भरणा करून देणारा त्याच्या घरात,दुकानात अवैध गॅस साठा कोणत्या कायद्यानुसार आणि कोणाच्या आशीर्वादामुळे करीत आहे, अवैध गॅस भरून देणाऱ्याला दररोज वीस ते पंचवीस घरगुती वापराच्या गॅस हंड्या कोणती गॅस एजन्सी पुरवठा करते.आणि अवैध गॅस हंडी पावती कोणत्या ग्राहकाच्या नावाने आणि कोणत्या ग्राहकाच्या स्वाक्षरीने गॅस एजन्सी मध्ये नोंद केली जाते आणि कोण कोणत्या ग्राहकांच्या नावावर वाजवीपेक्षा जास्त घरगुती वापराच्या गॅस हंडीची नोंद गॅस एजन्सी मध्ये करण्यात आली आहे याची चौकशी यावल पुरवठा विभाग मार्फत प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केल्यास यावल तालुक्यातील गॅस एजन्सी मार्फत घरगुती वापराचा गॅस अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहनांमध्ये सर्रासपणे वापरला जात असल्याचे उघडकीस येऊन मोठा गैरप्रकार,भ्रष्टाचार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here