व्हेंटिलेटर न मिळाल्यानं 17 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू!

0
1

साईमत लाईव्ह प्रतिनिधी यवतमाळ :

17 वर्षांची वैष्णवी. यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून तिला उपचारासाठी नागपुरात (Nagpur death) आणलं. वैष्णवीची मृत्यूशी झु्ंज सुरु होती. प्रकृती खालावत गेली. तातडीनं तिला व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं. 17 वर्षांच्या वैष्णवीचा आईवडिलांसमोरच तडफडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित केला जातोय.

वैष्णवी 17 वर्षांची तरुणी अस्वस्थ होती. तिच्यावर यवतमाळमध्ये उपचार सुरु होते. 14 तारखेच्या रात्री तिला यवतमाळमधून नागपुरात आणण्यात आलं होतं. तिला पोटाचा विकार होता. ती वेदनेने विव्हळत होती. प्रकृती अधिक खालावत चालली होती म्हणून डॉक्टरांनी वैष्णवीला नागपूरच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे तिला नागपुरात तिचे आईवडील घेऊन आले. पण नागपूरच्या मेडिकल कॉलेजात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.

व्हेंटिलेटवर नसल्यामुळे या तरुणीला डॉक्टरांनी एब्यु बॅग देण्यात आली होती. एम्ब्यु बॅग म्हणजे एक प्रकारचा कुत्रिम फुगा असतो, जो दाबल्याने श्वास घेण्याच्या प्रकियेत रुग्णाला मदत होते. ही ऍम्ब्युबॅग वैष्णवीच्या आईवडिलांना दाबावी लागत होती. वैष्णवीला जिवंत ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर न मिळाल्यानंतर डॉक्टरांनी ऍब्म्यु बॅगचा वापर केला होता.पुढचे 20 तास वैष्णवीचे आईवडील ही ऍम्ब्यु बॅग हाताळत होते. मुलीला जिवंत ठेवण्यासाठी व्हेंटिलेटर मिळू शकला नाही आणि वैष्णवीचा तडफडून मृत्यू झाला, असा आरोप आता वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. यवतमाळवरुन उपचारासाठी मुलीला नागपूरला आणून देखील तिचा जीव न वाचल्यामुळे तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील वैष्णवी राजू बागेश्वर या मुलीच्या मृत्यूने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. कोरोना काळात वेगवेगळ्या रुग्णालयांना व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला होता. व्हेंटिलेटरची खरेदीही करण्यात आल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. खरंतर आता कोरोनाइतकी प्रचंड रुग्णवाढही नाही. आरोग्य यंत्रणेवर महामारी इतका प्रचंड ताणही नाही. तरिही या तरुणीला वेळीच व्हेंटिलेटर शासकीय रुग्णालयात का मिळू शकला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here