साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी
शहरात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. महिलांकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या एका महिलेसह हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल सरिता’मध्ये हॉटेल चालक महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास हॉटेल सरितावर छापा टाकला. हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये चार प्रौढ मिहिला आढळुन आल्या. महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक एक ४९ वर्षीय महिलाअसून तीने त्या चार महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरिता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. पोलिस पथकाने त्या हॉटेल चालक महिलेस अटक करुन तीच्या ताब्यातील एक मोबाईल व चार हजार ५०० रोख रक्कम हस्तगत केला. पोलिसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका करुन हॉटेल चालक महिलेसह हॉटेल मालक या दोघांविरुध्द उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुव्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश, पोलिस निरीक्षक के.एस. पटेल, उस्मान शेख, पोलिस उपनिरीक्षक चाटे, सहायक पोलिस कऱ्हाळे, महिला पोलिस पुरी, पोलिस नाईक सांगळे, राऊत, शेख, महिला पोलिस नाईक जाधव,अंभुरे, खांडेकर, साळुंके, जमादार, पाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा अधिक तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’चे (एएचटी सेल) प्रभारी पोलिस निरीक्षक के.एस. पटेल करीत आहेत.