Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावच्या गायत्री ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावत ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. गायत्री च्या या यश्या मुळे जळगावच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे येथील मृणाल एंटरटेनमेंट आणि ग्रुमिंग आयोजित ही स्पर्धा फक्त सौंदर्य स्पर्धा नसून, यात इतर शरीर सौंदर्याच्या किंवा ग्लॅमरस , फॅशन स्पर्धांपेक्षा वेगळेपण आहे. त्यात भारतीय पुरातन वारसा जपणे हे मुख्य उद्देश आहे. मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून उभी राहिलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. गायत्रीने अजिंठ्याची प्रतिकृती बनून त्याबद्दल माहिती आणि लावणी विषयी सध्याचे समज गैरसमज याविषयीचे…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तहसील कार्यालय व यावल पोलीस स्टेशन कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर एक जण आपल्या निवासस्थानी घरगुती वापराच्या गॅस हंड्यांचा साठा करून चार चाकी वाहनांमध्ये तो गॅस भरून दर महिन्याला लाखो रुपयाची उलाढाल करीत आहे याकडे मात्र यावल तहसीलदार,पुरवठा विभाग, यावल पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चार चाकी वाहनधारक चालक-मालक यांच्याकडून केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गॅसवर चालणाऱ्या चार चाकी वाहनात एक घरगुती वापराची गॅस हंडी चार चाकी वाहनात भरून देण्यासाठी एक जण चार चाकी वाहनधारकांकडून अनधिकृतपणे बेकायदा आणि कोणतेही पावती वगैरे न देता 1150 ते 1200 घेऊन आपली चांदी आणि कमाई करून…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी हजारो भाविकांचे,भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या यांच्या श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. सोमवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजेपासून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबार सकाळी सात वाजता आरती,आठ वाजता सेवा,दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी बारा वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री आठ वाजता महाआरती व रात्रभर ठिक- ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे. मनवेल ग्रामपंचायत मार्फत व गावकरी आपआपल्या भागात स्वच्छता मोहीम राबवून…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी यवतमाळ : 17 वर्षांची वैष्णवी. यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून तिला उपचारासाठी नागपुरात (Nagpur death) आणलं. वैष्णवीची मृत्यूशी झु्ंज सुरु होती. प्रकृती खालावत गेली. तातडीनं तिला व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. 24 तास ते व्हेटिंलेटर मिळावा म्हणून संघर्ष करत राहिले. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड थांबली नाही. पण तोपर्यंत वैष्णवीचे श्वास थांबले आणि वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्यानं आईवडिलांनी आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गमावलं. 17 वर्षांच्या वैष्णवीचा आईवडिलांसमोरच तडफडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. इतकंच नव्हे तर या घटनेनं आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित…

Read More

तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कुठून येते? तुम्ही म्हणाल की तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरची सेवा घेतली आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या जागी टॉवर आहेत जिथून तुम्हाला नेटवर्क मिळते. जेथे टॉवर नाहीत किंवा दूर आहेत, तेथे नेटवर्क कमी आहेत. उदाहरणार्थ, जंगल इ. आता टॉवरऐवजी थेट उपग्रहावरून इंटरनेट कसे मिळते. असे झाले तर जंगल असो की तळघर, इंटरनेटचा वेग कुठेही कमी होणार नाही. स्टारलिंक अशीच सेवा देते. (world’s fastest Internet star link-Elon Musk) स्पेस एक्स ही इलॉन मस्क ची कंपनी आहे. स्टारलिंग हे स्पेस एक्स द्वारे संचालित उपग्रह इंटरनेट ‘नक्षत्र’ आहे. स्टारलिंक ४० देशांमध्ये उपग्रह इंटरनेट प्रवेश प्रदान करते. स्पेस एक्स ने २०१९ मध्ये स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी: देशातील वीज निर्मिती केंद्रावर कोळशाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कोळशाची वेळेत पुर्तता न झाल्याने विद्युत निर्मिती केंद्र बंद पडले होते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे तणाव वाढला होता. कोळशाच्या पुरवठा वेळेत न झाल्याने राजस्थान, दिल्लीसहित मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये अनेक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या परिस्थितीपासून धडा घेत, केंद्र सरकारने कोळसा संकटावर मात करण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केला होता. ऐन सणासुदीत पुन्हा कोळशाचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्राने अगोदरच कंबर कसली होती. आता सणासुदीत बित्तगूल होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 2 कोटी टन कोळश्याची आयात (Coal Import)…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी सोयगाव तालुक्यातील माळेगाव(पिप्री) येथील विवाहित महिला दि. ०३ सप्टेंबर २०२२ ला आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतातून कुणालाही न सांगता निघून गेली आहे १३ दिवस उलटूनही अद्यापही ही विवाहित महिला घरी परतली नसून सोयगाव पोलीस याबाबत तपास करीत आहे. सविस्तर वृत्त असे की सौ.वैशाली रामेश्वर पाटील वय(२३) राहणार माळेगाव(पिप्री)ता.सोयगाव ही विवाहित महिला दि.३ सप्टेंबर सकाळी १०.३० मी. शेतात कामाला गेली व शेतातून परस्पर कुणालाही न सांगता निघून गेली सदरील महिलेला १४ महिन्याचा मुलगा आहे , याबद्दल तिच्या सासरच्या लोकांनी विवाहित महिलेच्या माहेरच्यांना तसेच सर्व नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली असता ती आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव दि.१६. संपूर्ण राज्यात लम्पी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले हा लम्पी हा आजाराची लागण प्रामुख्याने गाय व बैल या गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यानुसार सोयगाव तालुक्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका पशूवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. तालुक्यातील जरंडीसह परिसरात गुरांमध्ये लम्पी या आजाराचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरत आहे या आजाराची लागण झालेली गुरे अशक्त होत आहेत व यांच्या मुळे इतर गुरांमध्ये हा आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिका व जळगाव प्लॉगर्स यांच्या संयुक्तविद्यमाने आज मेहरूण ट्रॅक परिसरापासून स्वछता युवा रॅली काढण्यात आली. महापौर जयश्रीताई महाजन यांनी श्रीफळ वाढवून शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेला या रॅलीने सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री महाजन यांच्यासह आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, प्लॉगर्सच्या चेतना जैन व जळगाव प्लॉगर्सची टीम व आदी उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी  माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यांना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा कॉंग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. नंदुरबार हा आदिवासी पट्टा कॉंग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित…

Read More