साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील सुनील दादाराव जाधव(३३) हे सैन्यदलात हवालदार पदावर कर्तव्य बजावत असताना त्यांचे गुरुवारी (ता.१५) हृदविकाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(ता.१६) शासकीय इतमामात हजरोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी कन्नडमार्गे त्यांचे पार्थिव पिशोर येथील सिल्लोड नाक्यावर येताच हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने सुनील जाधव अमर रहे,भारतमाता की जय,वंदे मातरम आशा घोषणा दिल्या सजवलेल्या टॅक्टरमधून अत्यंयात्रा काढण्यात आली. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,माजी आमदार हर्षवर्धन जाधव,तहसीलदार ,गटविकास अधिकारी यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्यासह आदींनी यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दाजली वाहिली. सुनील जाधव यांना दोन वर्षांचा मुलगा व पुतण्या…
Author: Saimat
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी शहरातील जारगांव चौफुली वरील एका स्पेअरपार्ट दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले १ लाख १५ हजार रुपये चोरुन नेल्याने घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर मुबारक जहांगीर देशमुख रा. प्लाॅट नं. १६८, अक्सा नगर, पाचोरा यांचे सोनी अॅटोमोबाईल नावाचे चारचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअरपार्टचे दुकान आहे. नित्य नियमाप्रमाणे मुबारक देशमुख यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते व दुकानात काम करणारे कामगार घरी निघुन गेले. दरम्यान दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मुबारक देशमुख यांना…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता सप्टेंबर महिन्यात झालेल्या पिकांची नुकसानीची माहिती संकलित करून तातडीने त्या नुकसानीचे पंचनामा करा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोयगावला दिले आहे यामुळे सोयगाव तालुक्यात सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची चिंता आता मिटली असून तालुका प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सोयगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात चारही मंडळात सतत पावसाची नोंद झाली असून जरंडी मंडळात वादळी वाऱ्यात कपाशी बाजरी ज्वारी मका आडवे झाले होते परंतु शासन निकषानुसार अतिवृष्टीच्या नोंद न झाल्याने तालुका प्रशासनाने नुकसानाची पंचनामे आती घेतले नव्हते परंतु आता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता…
स्वयंपाकघरात हळदीला फार महत्त्व आहे. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. तसेच हळदीचे फायदेदेखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हळदीचा फायदा आपल्या त्वचेला आणि आरोग्यासाठी होतो. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी मानली जात नाही. काही दुखापत झाल्याससुद्धा हळदीची पेस्ट लावली जाते; परंतु हळदीचा वापर गरजेपेक्षा जास्त केला तर त्याचा आपल्याला त्रासही होऊ शकतो. ग्रेटर नोएडाच्या GIMS रुग्णालयात कार्यरत असलेल्या लोकप्रिय डायटीशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले आहे की, हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात हे सगळ्यांनाच माहिती असते. पण कोणत्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने नुकसानही होऊ शकते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात,…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आदर्श शिक्षक सोहळा दिनांक १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील तिडका येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक एमआयएम सोयगाव तालुका अध्यक्ष रईस शेख( अखिर दादा यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून केले होते हा पुरस्कार सोहळा केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका येथे पार पडला यावेळी तालुक्यातील ४६ शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रमुख अतिथी सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, खासदार इम्तियाज जलील यांचे सुपुत्र बिलाल जलील, एमआयएम जिल्हा अध्यक्ष समीर साजेद बिल्डर,सोयगाव तालुका शिक्षणविस्तार अधिकारी आढाव यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव व सत्कार करण्यात आला यावेळी नंदू बापू सोळंके, मुकेश शेठ,…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचेसह सहाय्यक फौजदार महाजन यांचे निलंबन केले आहे. आता बकाले यांच्या जागी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख म्हणून पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसनराव लक्ष्मण नजन पाटील पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक…
साईमत लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी : अंगावर खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न बाळगून चिकाटीने मेहनत करणाऱ्या दोन तरुणांचे स्वप्न नियतीने त्यांच्यापासून अत्यंत क्रूरपणे हिरावून घेतलं आहे. पोलीस भरतीसाठी पहाटे लवकर उठून व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस (police) भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांना बसचा धक्का लागून झालेल्या अपघातात त्यांचे दोन्ही हात अक्षरशः तुटून पडले आहेत. सदर घटनेने तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहणार असेच दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district) मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी ही घटना घडली आहे. सदर तरुण हे रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यादरम्यान, ही घटना घडली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली असून, तरुणांना धक्का…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी अपंगांसाठी सभागृह बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता आणि अपूर्ण असताना तसेच इतर काही कामे प्रत्यक्ष जागेवर न होता फक्त कागदोपत्री करून संबंधित ठेकेदारांना संपूर्ण कामाची बिले अदा केल्याचा गैरप्रकार,भ्रष्टाचार आणि यावल पंचायत समिती तपासणी संशयास्पद असल्याची घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरे ग्रामपंचायत मध्ये घडल्याची तक्रार खुद्द ग्रामपंचायत सदस्यांने केल्याने ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाल्यास ग्रामपंचायतचा मोठा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे डोंगर कठोरा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. ग्रामपंचायतच्या वसुली निधी मधून गावातील अपंग बांधवाना आतापर्यंत कोणताच लाभ दिला गेला नाही.अपंग बांधवांवर ग्रामपंचायतीने आता पर्यंत कोणत्या योजनेतून किती निधी खर्च केला आहे किंवा…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात दिवसाढवळ्या मध्यप्रदेशातून लाखो रुपयाचा गुटखा येत असतो. मुक्ताईनगर शहरामध्ये एक लाखो रुपयाचा गुटखा तस्करी करणारी गाडी पत्रकार व नागरिकांनी पकडून, त्यासंदर्भातील पोलीस निरीक्षकांना माहिती देऊनसुद्धा घटनास्थळी येण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरल्याचे वास्तव समोर येत असून गाडीमालक फरार करण्यात, पोलीस प्रशासनाचे असे वागण्याचे नेमके कारण काय, या प्रकरणाला आर्थिक हितसंबंधाची किनार असल्याची खमंग चर्चा मुक्ताईनगर शहरवासियांमध्ये चांगलीच रंगली आहे. काल सायंकाळच्या सुमारास नागरिक व पत्रकारांनी गुटख्याची गाडी पकडली असतांना मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना फोन लावूनसुद्धा घटनास्थळी एक तासापर्यंत कुठले कर्मचारी पोहचू शकले नाही. गुटखा तस्करांकडून आमची वरपर्यंत लाईन असल्याची भाषा वापरली गेली तर गुटख्याची गाडी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर जळगावचे बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे यांनी अभिषेक कौल यांना पाठवलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की , बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापुरात मे महिन्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली होती . त्या बैठकीतील चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून जळगावचे बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर सदस्य म्हणून सन 2022-23 या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे . जळगावचे बांधकाम व्यावसायिक…