साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.एस. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव मध्ये ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर हे होते तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे हे उपस्थित होते .
कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभागाध्यक्षा डॉ. सुनिता एन. कावळे यांनी केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी कहानी, कविता, विविध गीत सादर केले. अध्यक्ष डॉ.एम. व्ही. बिल्दीकर सरांनी हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपण प्रयत्नरत राहिले पाहिजे तसेच हिंदी भाषेचे महत्व, उपयोग व व्याप्ती विशद केली. तर काटे सरांनी हिंदी विषयाचे महत्त्व विशद केले .आदित्य जाधव, मुस्कान पिंजारी, निकिता पाटील, शेख समीर, देवाजी गायकवाड, शुभमकुमार साकेत, अमरसिंग राजपूत या विद्यार्थ्यांनी कहानी, कविता सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नयना प्रशांत पाटील यांनी मानले.