साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
पुणे येथे झालेल्या मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावच्या गायत्री ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावत ही स्पर्धा आपल्या नावावर केली आहे. गायत्री च्या या यश्या मुळे जळगावच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे.
पुणे येथील मृणाल एंटरटेनमेंट आणि ग्रुमिंग आयोजित ही स्पर्धा फक्त सौंदर्य स्पर्धा नसून, यात इतर शरीर सौंदर्याच्या किंवा ग्लॅमरस , फॅशन स्पर्धांपेक्षा वेगळेपण आहे. त्यात भारतीय पुरातन वारसा जपणे हे मुख्य उद्देश आहे. मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून उभी राहिलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. गायत्रीने अजिंठ्याची प्रतिकृती बनून त्याबद्दल माहिती आणि लावणी विषयी सध्याचे समज गैरसमज याविषयीचे कथन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये केले. त्यात यश मिळवून गायत्री हिने आपल्या परिवारासह जळगावचे नाव लौकिक केले आहे.
गायत्री ही शहरातील आर. आर विद्यालयातील लिपिक मनोज ठाकूर (वाघ) यांची कन्या आहे. तिला लहानपणापासूनच कलेविषयीची विशेष ओढ असून ती नृत्य, नाट्य त्याच बरोबर विविध गीतांमधून आपली कला सादर करत असते. तिने नाट्यशास्त्राची पदवी प्राप्त करून मुंबई विद्यापीठातून लोक कलेची पदवी सुद्धा घेतली आहे.