धरणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापकच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

0
1

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी :

युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक श्री. भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासुन सुरू केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, शेतकरी योगेश रामलाल पुरभे रा. मोठा माळी वाडा, धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगांव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. व जे काही पीक हाती आले ते नाईलाजास्तव कमी दराने विक्री करावे लागले. त्यातही कोरोणा महामारी असल्यामुळे शेती मालाला भाव मिळाला नाही. कोविड १९ च्या महामारीत तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली होती. याकारणाने मी बँकेचे कर्ज वेळेवर परत फेड करू शकलो नाही. परंतू आम्ही पती-पत्नीने काबाड कष्ट केला, व कोरोना सारख्या जीवघेण्या महामारीशी दोन हात संघर्ष करीत आम्ही कोरोनातून सावरलो.

आणि अश्याही आर्थिक हालाखीची परिस्थितीत थकीत हप्ताचे कर्ज दि. २ फेब्रुवारी, २०२२ रोजी बँकेच्या आकडेवारीनुसार व्याजासकट परतफेड केले. तद्नंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात युनियन बँकेचे व्यवस्थापक श्री. भुषण मोरे साहेब यांना पीक कर्ज संदर्भात मागणीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला होकार देत सांगितले की, पीक कर्जसाठी चे प्रकरण तयार करुन बँकेकडे सादर करा, मी तुम्हाला दोन दिवसात नविन पीक कर्ज उपलब्ध करून देतो. तद्नंतर मी शाखा व्यवस्थापक श्री. मोरे साहेब यांच्याकडे पीककर्ज साठी निरंतर गेलो असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळण्याचा प्रयत्न केला. कित्येक वेळा तोंडी व पत्र व्यवहार केला. आज रोजी मला शेतीसाठी पीक कर्जाची अत्यंत गरज आहे, तसेच मी शेतीसाठी अनेकांकडून हात उसनवारी पैशांची मदत घेतली असुन सद्या माझी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झाली असून माझ्यावर व माझ्या परिवारावर आत्महत्येची वेळ आली आहे.

तरी सुद्धा मी मा.शाखा व्यवस्थापक मोरे साहेब माझी दखल न घेता, काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मला सबळ कारण न सांगता सांगितले की, तुला मी मुळीच पीककर्ज देणार नाही. उलट मला अश्लील शिवीगाळ करीत म्हणाले की, जास्त शहाणपणा करशील तर तुझ्यावर गुन्हा दाखल करील, तसेच, तुझ्या माहितीस्तव सांगतो, मी कोणालाही घाबरत नाही, माझ्याबाबतीत तुला जेथे तक्रार करायची असेल तिथे कर..! वरीष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, राजकिय पुढारी, जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस स्टेशन, कृषी अधिकारी कोणाकडे पण तक्रार कर मी तुला युनियन बँकेतुन कर्ज देणार नाही अश्या पध्दतीने सदर शाखा व्यवस्थापक मोरे यांनी मला धमकाविले आहे.

म्हणून मी न्याय मागावे तरी कोणाकडे..? अशी माझी अवस्था झालेली आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. परंतु धरणगांवात युनियन बँक शाखा व्यवस्थापकाकडुन माझ्यासारख्या सामान्य शेतकरीला अश्या प्रकारे त्रास दिला जात आहे. शासनाचे धोरण आहे, शेतकरी सुखी, तर देश सुखी, शेतकरी जगला पाहीजे. म्हणून मी युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापक श्री. मोरे यांच्या दबावतंत्र व मनमानी विरोधात दि.१९ सप्टे, सोमवार पासून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. या उपोषणाच्या संदर्भात शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, धिरेंद्र पुरभे यांनी उपोषणकर्ते योगेश पुरभे व युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक भूषण मोरे यांची भेट घेतली असून मोरे यांना विनंती करीत सांगितले की, कुठंतरी शेतकरी बांधवांना सहकार्य करावे. असे उपोषणकर्ते योगेश रामलाल पूरभे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here