Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ पत्रकार तथा धर्म गुरू मुफ्ती हारून नदवी यांची व्हाईस ऑफ मीडिया च्या उर्दू भाषिक सेल च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती व्हाईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष, संपादक संदीप काळे यांनी केली आहे. शहरातील ईकरा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या एका सामाजिक कार्यक्रमात मुफ्ती हारून नदवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर नियुक्तीपत्र देण्यात आले. मुस्लिम समाजाच्या जमाते उलेमा या संघटने तर्फे व्यसनमुक्ती आणि वाढत्या आत्महत्या रोखण्या संदर्भात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती देण्यासह प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यावेळी त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रारंभी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा  प्रतिनिधी येथील सीएनजी ग्रुप, चोपडा पिपल्स बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व इतर सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरात होणार्‍या कार्यक्रमाप्रमाणेच या उत्सवाचे आयोजन होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील व तालुक्यातील जनतेने या उत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा व कधीही न घेतलेला अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उत्सवात सुप्रसिध्द गायक अभिदत्त, शांभवी ठाकूर, आर्यन तिडके, सागर केडुंरकर, आकाश झवेरी, जतिन उदासी, दिवेश राणा, आवेश दरबार, वरूण शर्मा (चु-चा) येत आहेत. सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  २६…

Read More

साईमत लाईव्ह यावल तालुका  प्रतिनिधी दुर्मिळ असलेला पोवळा जातीचा विषारी लहान साप यावल तालुक्याच्या सीमेवर तसेच रावेर तालुक्यातील ’रिधोरी’ गावात आढळून आल्याने तेथील स्थानिक सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले. पोवळा हा आपल्या परीसरात आढळून येणार्‍या विषारी सापातील सर्वात लहान सांप असून हा साप तांबुस,तपकिरी रंगाचा असतो.या सापाच्या शेपटीला दोन काळे पट्टे असतात.असे काळे पट्टे बिनविषारी काळतोंड्या या सापामध्ये आढळुन येत नाही.पोवळा या सापाला डिवचले असता हा शेपटीची गुंडाळी करुन शेंदुरी/केशरी रंग प्रदर्शित करतो.असा हा पोवळा जातीचा साप रिधोरी गावात आढळून आल्याने सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्याचे रेस्क्यू केले.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि. २७ सप्टेंबररोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सवांद माध्यमतज्ज्ञ डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे माजी कार्यक्रम अधिकारी तथा नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.बबन नाखले आणि मुंबई येथील लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव हे ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी बहुजन समाजाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची कास धरावी. संघटित होऊन महात्मा फुले यांचा कृतिशील वारसा चालवणे आजही काळाची गरज आहे, असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जळगावात केले. सत्यशोधक समाजाने २४ सप्टेंबर रोजी १५०व्या वर्षांत पदार्पण केले. महात्मा फुले यांच्या अतुलनीय ऐतिहासिक कार्याच्या वाटचालीची कृतज्ञ आठवण म्हणून शनिवारी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी, सत्यशोधकी साहित्य परिषद, भीम-रमाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्स यांच्यातर्फे श्रीरत्न कॉलनीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. सत्यजित साळव, इंदिरा…

Read More

साईमत लाईव्ह  धानोरा ता.चोपडा  ः वार्ताहर शेतकर्‍याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवून यात बैल ठार झाला ही घटना पुनगाव ता. चोपडा येथे शनिवारी रात्री निवृत्ती जगन्नाथ सोनवणे यांच्या खळ्यात घडली. यात शेतकर्‍याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सहा वेळा या परिसरात हल्ला करून आठ जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तसेच गुरुवारी रात्री विकास लक्ष्मण खांजोडे (कोळन्हावी शिवार) यांच्या बकरीवर हल्ला करून बिबट्याने ठार केली होती.बिबट्याने शनिवारी रात्री  बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना रविवारी सकाळी शेतकरी निवृत्ती सोनवणे खळ्यात गेले…

Read More

साईमत लाईव्ह साकेगाव, ता. भुसावळ : वार्ताहर साकेगावात ग्रा.पं.च्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत असतांना व या संदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे रितसर तक्रार केली जात असतांना, विकासकामे होत नसल्याचा आरोप करीत वार्ड क्र. १ मधील ग्रा.पं. सदस्या सुनिता सुभाष सोनवणे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. साकेगाव ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीत २०२१ मध्ये ग्रामविकास पॅनेलच्या माद्यमातून सुनिता सुभाष सोनवणे या वार्ड क्र. १ मधून विजयी झाल्या होत्या. त्यांना वार्डात विकासाची कामे होतील, अशी अपेक्षा होती मात्र पदरी निराशा पडल्यामुळे त्यांनी सरपंच योगिता सोनवणे यांच्याकडे आज रोजी राजीनामा सादर केला आहे.  याच्या प्रती गटविकास अधिकारी व जि.प. सिईओ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Read More

साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पूर्णपणे सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखीनच अधोगती करण्याचा व राजकीय प्रदूषण वाढवण्याचा चंग बांधलेला दिसतोय.. एकनाथजी, रामदासभाईंना आवरा! असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. ते पारोळा येथील धिक्कार सभेत बोलत होते. रामदास कदम यांच्या ‘‘ त्या ‘‘ वक्तव्याचा निषेध व्यक्त करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने पुढे म्हणाले की, रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे. टीका करताना अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा असतात हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या सरकारने राज्यातील गरजू व गरीब लोकांसाठी जी शिवभोजन थाळी योजना अमलात आणली होती ती आता बंद होण्यण्याच्या मार्गावर आहे. शिंदे फडणवीस सरकारला या योजनेत गैरव्यहार असल्याचा संशय आहे. त्यामुळे हि योजना बंद होण्याची शक्यता आहे. हि योजना बंद झाल्यास राज्यातील गरजवंतांना चांगलाच मोठा फटका बसेल. कोरोना काळात या थाळीची किंमत ५ रुपये होती तर आता त्याची किंमत १० रुपये करण्यात आली. या योजनेमुळे गोर गरिबांना मोठा आधार मिळत होता. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास सरकारने राबवलेल्या योजनांना स्थगिती अथवा त्या बंद करण्यात येत आहेत. हाच पाढा शिवभोजन थाळी योजनेचा सुद्धा वाचण्यात आला आहे. महाविकास…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी शिक्षक दिन,मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांच्या निमित्त सोयगांव शिक्षक भारती यांनी शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन सोयगांव तालुक्याचे तहसीलदार मा.रमेश जशवंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जशवंत यांनी शिक्षक भारती,सोयगांव यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले.यावेळी सोयगांव नगराध्यक्षा आशाबी तडवी,शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील,प्रशाला सोयगांव मुख्याध्यापक गिरिष जगताप,सोयगांव केंद्र प्रमुख फिरोज तडवी,नितीन राजपूत केंद्र प्रमुख बनोटी,गोपाल पाटील केंद्र प्रमुख जरंडी,विकास पवार मुख्याध्यापक बनोटी,रामदास फुसे,अनिल ठाकूर,समाजसेेवक राजेंद्र दुतोंडे,नगरसेवक गजानन कुडके,राजू माळी,योगेश बोखारे मान्यवर प्रमुुख अतिथी म्हणूून उपस्थित होते.या शिबीरास जळगांव…

Read More