साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयास शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून एकूण १४ अभ्यासक्रमासाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. ही सुविधा महाविद्यालयाला मिळण्यासाठी अद्यावत संगणक प्रयोगशाळा वायफाय परिसर सुसज्ज इमारत व पुरेशी बैठक व्यवस्था तसेच इतर सर्व सोयी सुविधा अनुभवी तज्ञ मार्गदर्शक कर्मचारी वर्ग या सर्व बाबींची अंकेक्षण करून मान्यता दिली जाते. शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये या सुविधा केंद्रात मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ एचएमसीटी, मास्टर आर्किटेक्चर, एम बी ए /एम एम एस, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन( एम सी ए), बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (बी ई…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी मुंबई येथे मंत्रलायात राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दि.28 सप्टेंबर रोजी दुपारी दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील , औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उद्योग मंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. त्यानुसार जागेची पाहणी, जागेचे सर्वेक्षण , भू निवड समितीच्या अहवालाचा संपूर्ण तपशील, अशा सर्व बाबींचा परामर्श घेवून बैठकीत सारोळा ता.मुक्ताईनगर परिसरात सुमारे 600.25 एकर (सव्वा सहाशे एकर) क्षेत्रफळावरील जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली. लवकरात लवकर…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोट्याशा गावात जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयोन्मुख तरुण अष्टपैलू खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली असून याबद्द्ल त्याच्यावर समाजातील सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव हेोत आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहीवासी असलेल्या कल्पेश नारायण क्षिरसाळे हा फैजपूर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणापासूनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता.अट्रावल सारख्या छोट्या गावात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेपर्यंत उंच भरारी घेतली आहे. येत्या 8 ऑक्टोंबरपासून दुबई येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेसाठी कल्पेश…
साईमत लाईव्ह शेंदूर्णी प्रतिनिधी गरुड़ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी “गंगा” नर्सरी कळमसरा ता.पाचोरा येथे अभ्यास दौऱ्या निमित्ताने भेट दिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमात गंगा नर्सरीचे संचालक श्री.दत्तात्रय तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व रासेयो स्वयंसेवकांना आपले अनुभव व ज्ञान कथन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीची शास्त्रोक्त माहिती देऊन झाडांची निगा कशी योग्य पद्धतीने राखता येईल याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या संस्कृतीत निसर्गाचे स्थान अढळ असल्याचे प्रतिपादन केले.त्यांनी या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना विविध भारतीय प्रजातीचे देशी वृक्ष,वेली व औषधी वनस्पतींची ओळख करून देत महत्व पटवून दिले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.दिनेश प्रकाश पाटील उपस्थित होते.त्यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत बोदवड तालुका आयोजित भव्य दहा दिवसीय श्रामनेर शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम तक्षशिला बुद्ध विहार, साखला कॉलनी, बोदवड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला पहिल्या सत्रामध्ये कालवश धम्मदूत तायडे यांच्या अभिवादन करण्यात आले. सभेचा कार्यक्रम करण्यात आला. दुसर्या सत्रामध्ये श्रामनेर प्रवज्जा विधी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव गुरुजी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी केले. प्रसंगी पूज्य भंते दीपंकर थेरो चैत्यभूमी, दादर, मुंबई यांनी प्रवज्जा विधी संपन्न केला. सदर श्रामनेर शिबिराचे…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी गावालगच्या शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचे अपहरण करून आरोपीच्या घरात सहा तास डांबून ठेवल्याची घटना पळाशीतांडा ता सोयगाव येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरुणांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे..या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पळाशी तांडा ता सोयगाव येथील अल्पवयीन प्रातर्विधी साठी गावालगत असलेल्या शेतात गेली असता,तिघांनी तिचा पाठलाग करून यातील आरोपी शिवाजी इंदल पवार यांच्या घरात पीडितेला डांबून ठेवून झालेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तुला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी पीडितेच्या…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील जरंडी व कंकराळा मोबाईल व्हॅन द्वारे लोकअदालत शिबिर आयोजित करण्यात आले होते , या शिबिराचे अध्यक्ष सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.इंगोले होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,व सोयगाव वकील संघ उपस्थित होते,मान्यवरांचा सत्कार जरंडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला तसेच कंकरळा येथे सरपंच चंदाबाई शिवदास राजपुत यांनी फुलगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले केले,तसेच या शिबिरामध्ये गावातील जे प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्यांना तडजोड करायची आहेत असे प्रकरणं गावातच निकाली काढण्यात आले,तसेच कायदेविषयक मार्गदर्शन मान्यवरांनी केले यामध्ये तालुक्यातील सर्व वकील संघाचे अध्यक्ष अँड राजेंद्र अ. गिरी,अँड.योगेश जावळे उपाध्यक्ष,अँड, प्रकाश…
साईमत लाईव्ह धानोरा प्रतिनिधी सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी च्या नवरात्रोत्सवाला २६ सोमवार पासुन प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या महामारी नंतर प्रथमच सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त मेहनत घेतांना दिसुन येत आहेत. २ ऑक्टो रविवार रोजी सप्तमी व ३ ऑक्टो.सोमवार रोजी अष्टमी असल्याकारणाने मनुदेवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातुन लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचे भाकित वर्तविले जात आहे . यासाठी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या व यावल पोलिस स्टेशनच्यावतीने कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून नुकतीच २५ रविवार रोजी सकाळी ११ वा. मनुदेवी नवरात्रोत्सवात नियोजन व सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावल नायब तहसीलदार…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी प्रत्येक माध्यमांची स्वतंत्र अशी भाषा आहे. माध्यमात प्रादेशिक भाषेचा प्रभाव वाढत असल्याने ती अधिक लोकाभिमुख होत आहे. प्रादेशिक बोली भाषेचा प्रभावीपणे वापर माध्यमातील आशयात होत असल्याने सामान्यांचे प्रतिबिंब हे माध्यमांमध्ये उमटत असते. परिणामी माध्यमांची भाषा ही प्रदेश आणि काळानुरूप बदलत असल्याचा सूर वक्त्यांच्या मनोगतातून उमटला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मंगळवार दि. २७ रोजी ’माध्यमांची भाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. वेबसंवादात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सवांद माध्यमतज्ज्ञ डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सर्व सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी. २८ सप्टेंबर-आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन निर्देश दिले असून महाराष्ट्र शासनाने याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात कार्यतक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘‘माहिती अधिकार‘‘ या विषयावर जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या मार्गदर्शन करणार आहेत.त्यांचे समवेत उपायुक्त (आस्थापना) चंद्रकांत वानखेडे, जळगाव महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख यांना व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत तसेच संबंधित विभाग प्रमुख यांनी आपापल्या स्तरावर सर्वसामान्य…