साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
सर्व सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी. २८ सप्टेंबर-आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन निर्देश दिले असून महाराष्ट्र शासनाने याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात कार्यतक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ‘‘माहिती अधिकार‘‘ या विषयावर जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या मार्गदर्शन करणार आहेत.त्यांचे समवेत उपायुक्त (आस्थापना) चंद्रकांत वानखेडे, जळगाव महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख यांना व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत तसेच संबंधित विभाग प्रमुख यांनी आपापल्या स्तरावर सर्वसामान्य नागरिकांना माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे संदर्भात तसे आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहे. तरी सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गासह या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.