जळगाव जिल्ह्याची मान क्रिकेट क्षेत्रात उंचावली अट्रावलच्या अष्टपैल कल्पेश शिरसाळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

0
3

     साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोट्याशा गावात जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयोन्मुख तरुण अष्टपैलू खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली असून याबद्द्‌ल त्याच्यावर समाजातील सर्व स्तरामधून अभिनंदनाचा वर्षाव हेोत आहे.

यावल  तालुक्यातील अट्रावल  येथील रहीवासी असलेल्या कल्पेश नारायण क्षिरसाळे हा फैजपूर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणापासूनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता.अट्रावल सारख्या छोट्या गावात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेपर्यंत उंच भरारी घेतली आहे.
येत्या 8 ऑक्टोंबरपासून दुबई येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेसाठी कल्पेश याची इंडीयन नॅशनल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.या संघात निवड झालेला तो महाराष्ट्र राज्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे. नुकतेच  राजस्थानमध्ये आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सराव सामन्यांमध्ये देशातील सुमारे 500 च्यावर क्रिकेटपटूंनी भाग घेतला होता.

या  500 खेळाडूंंपैकी संपूर्ण देशभरातील 30 खेळाडुंची निवड करण्यात आली.त्यात महाराष्ट्र राज्यातून  अट्रावलच्या कल्पेश शिरसाळे या एकमेव खेळाडूची निवड करण्यात आली. या  इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ, मुंबईच्या निवड झालेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या सराव सामन्यात कल्पेश यांने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याची ही निवड करण्यात आली आहे. या सामन्यासाठी त्यास प्रशिक्षक म्हणून सलाह काजी व मधु सर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here