Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’  हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच उद्धव ठाकरे   आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलांनी एका मिनिटात गमावले, असे खडसेंनी म्हटले आहे. तसेच आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री…

Read More

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांचे हस्ते जळकोट ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व लोकार्पण करण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी जळकोट गावास भेट दिली असता, ग्रा पं . सदस्य तथा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. ठाकरे यांनी झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करून या कामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट गावचे सरपंच अशोक पाटील तर जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील शेलवड येथिल संजय सिताराम सोनवणे वय ४७ यांनी शेलवड शिवारातील स्वतच्या शेतात निबाच्या झाडाला दुपारी ऐक ते दिडच्या सुमारास फाशी घेतली. आत्महत्या झाल्याची वार्ता शुभम सुरेश अहिर यानी दिली. विविध कार्यकारी सोसायटी व ईतर कर्ज शेतकर् यावर असल्याची गावात चर्चा आहे. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये नोद दाखल असुन पोलिस निरीक्षक याच्या मार्गदर्शनात पो काँ संजय महाजन हे पुढील तपास करीत आहे. तर त्याचे ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन डाँ किर्ती साळी यानी केले.

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ऐ मिलाद च्या निमित्ताने उत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जुन्यागावातील सुन्नी जमा मज्जीद मधून ही मिरवणूक बस्थानकाकडे वाजत गाजत काढण्यात आली यावेळी मुस्लिम समाजबांधवांकडून गोड भाताचा प्रसाद वाटप करण्यात आला कजगाव परिसर मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मज्जीद चे मौलाना मोहमंद रियाज. मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष खालिक मणियार.सत्तार बागवान.शौकत पिंजारी .अबरार खाटीक.अमजद शाह.नासिर खाटीक.झाकीर खाटीक.अमीन शाह. मुजाहिद खाटीक .खालिद मणियार. मुस्ताक खाटीक .अय्युब खाटीक. आसिफ पिंजारी , रियाज खाटीक.हनिफ मणियार.आरीफ मलीक, व असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://youtu.be/fpeBWbZIl7Q

Read More

साईमत लाईव्ह निंभोरा ता. रावेर प्रतिनिधी निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या परिसरात अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, गांजाविक्री, जुगार, अवैध वाळूवाहतुक व इतर अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश लावणार, की सुरु ठेवणार? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे. घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा सध्या निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही परिस्थिती अनेकांचे संसार उधवस्त करीत आहेत. परंतू ‘घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा’. यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असून मटका, जुगार, दारु,…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी  लोकमान्य विद्यालय अमळनेर मध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत पर्यावरण पुरक उपक्रम म्हणुन “चित्रदुर्गा” ची दररोज चलस्थापना करण्यात आली. विद्यालयात नवरात्रीचे नऊ दिवस विद्यालयाचे कला शिक्षक श्री.मनोहर महाजन यांनी शाळेच्या फळ्यावर रंगीत खडू च्या साहाय्याने,श्री तुळजाभवानी (तुळजापूर),श्री महालक्ष्मी (कोल्हापूर)श्री.रेणुका माता(माहुर गड)श्री अंबादेवी (अमरावती)श्री रेणुका माता चांदवड)श्री भुमि माता(श्री मंडळ ग्रह मंदिर अमळनेर),राज राजेश्वरी पेडकाई माता ,श्री सप्तशृंगी देवी (वणी गड)श्री एकवीरा देवी (धुळे),याची चित्र काढून दररोज आरती व विधीवत पुजा करण्यात आली.या पर्यावरण पुरक धार्मिक उपक्रमास , जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक.श्री.नितिनजी‌ बचाव साहेब, जळगाव, यांनी भेट देऊन उपक्रमांचे कौतुक केले.या पर्यावरण उपक्रमांची संकल्पना व चित्र-श्री.मनोहर महाजन,(कला शिक्षक)याची तर…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव सा.बा.उत्तर विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे विशिष्ट ठेकेदारांना झुकते माप दिले जात असल्यामुळे अनेक ठेकेदारांनी बंड पुकारले असून मंत्रालयापर्यंत तक्रारी सुरु झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव सा.बा.उत्तर विभागातील कामे काही दिवसांपासून बीएनए भुसावळ याच एजन्सीला दिली जात आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी निघालेल्या ई-टेंडरची बहुतांश कामे देखील बीएनएलाच देण्यात आली. त्यामुळे इतर ठेकेदार कमालीचे संतप्त झाले आहे. जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बीएनएच्या गुणवत्तेच्या कामाचा दाखला दिला जातो. परंतू बाकीचे ठेकेदार गुणवत्ता पूर्वक कामे करत नाही का?, असा सवाल उर्वरित ठेकेदारांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, याबाबत आता पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी दिव्यांगाच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन च्या तालुकाध्यक्ष वर सोयगाव पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी व इतर मागण्यांसाठी गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयांवर दिव्यांगांनी डफडे वाजवून आंदोलन केले तर दिलेल्या आश्वासनाचे लेखी मिळत नसल्याने संतप्त दिव्यांगानी थेट तहसिल कार्यालयात प्रवेस केला होता. प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे हे ७३ टक्के अपंग असताना त्यांचेवर सोयगाव पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला यासह इतर तीन मागण्यांसाठी सोयगाव तहसिल कार्यालतावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे शहराध्यक्ष यासीन बेग,हकीम शहा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी डफडे आंदोलन करण्यात आले यामध्ये खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायदा २०१६…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील ठाणा, फर्दापूर, धनवट, वरखेडी तांडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, सोयगाव, गलवाडा, वेताळवाडी या गावात मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. भूमिपूजन झालेल्या वरील विविध गावांत मातोश्री पाणंद रस्ते, लेखाशीर्ष 2515, 3054, एफडीआर 3054 – 2419 आदी योजनेतून रस्ते विकासासह विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. भूमिपूजन करण्यात आलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावी. करण्यात येणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल…

Read More

साईमत लाईव्ह  यावल प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या मागणी संदर्भात यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी काल दि.3 रोजी यावल पंचायत समिती कार्यालया समोर एक दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याध्यक्ष विलासराव जोगदंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे, उपाध्यक्ष दयानंद कांबळे, महासचिव राजेंद्र जितकर, कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे, यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समिती येथे एक दिवशीय लक्षण व धरणे आंदोलन पार अध्यक्ष बाळासाहेब तायडे व संघटक खुशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,ग्राम रोजगार सेवकांच्या 14 वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी एक दिवसीय उपोषण व निदर्शने करण्यात आली. शासनाच्या निदर्शनास काही बाबी आणून…

Read More