साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
गावालगच्या शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचे अपहरण करून आरोपीच्या घरात सहा तास डांबून ठेवल्याची घटना पळाशीतांडा ता सोयगाव येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरुणांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे..या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पळाशी तांडा ता सोयगाव येथील अल्पवयीन प्रातर्विधी साठी गावालगत असलेल्या शेतात गेली असता,तिघांनी तिचा पाठलाग करून यातील आरोपी शिवाजी इंदल पवार यांच्या घरात पीडितेला डांबून ठेवून झालेला प्रकार कोणालाही सांगितल्यास तुला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आकाश बंडु चव्हाण (वय २२.) सुरेश विनोद चव्हाण( वय २१)शिवाजी इंद्ल पवार (वय२०) या तिघांविरुद्ध अपहरणाचा} व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेल् नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पळाशी तांड्यात धाव घेतली दरम्यान या प्रकरणी)आकाश बंडु चव्हाण (वय २२). सुरेश विनोद चव्हाण (वय २१ ) शिवाजी इंद्ल पवार (वय२०) या तिघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०२२(८) (१२) या अन्वये व ३६३,३५४,३५४(ए) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मनीष कालवानिय,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक श्रीधर गीते,उपनिरीक्षक सतीश पंडित, जमादार राजू बर्डे,विकास दुबिले, श्रीकांत तळेगाव कर,सिल्लोड येथील पिंक पथक आदी तपास करत आहे.