दहा दिवसीय भव्य श्रामनेर शिबिराचे उद्घाटन

0
15

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत बोदवड तालुका आयोजित भव्य दहा दिवसीय श्रामनेर शिबीराचे उद्घाटन  करण्यात आले. कार्यक्रम तक्षशिला बुद्ध विहार, साखला कॉलनी, बोदवड   या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला पहिल्या सत्रामध्ये कालवश धम्मदूत तायडे यांच्या अभिवादन करण्यात आले.

सभेचा कार्यक्रम  करण्यात आला. दुसर्‍या सत्रामध्ये श्रामनेर प्रवज्जा विधी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव गुरुजी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी केले.  प्रसंगी पूज्य भंते दीपंकर थेरो चैत्यभूमी, दादर, मुंबई यांनी प्रवज्जा विधी संपन्न केला. सदर श्रामनेर  शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक  आर. डी. गायकवाड, पुणे होते. प्रसंगी विचार मंचकावर  डॉ. अनिल वानखेडे जळगाव जिल्हा  पूर्व पालकमंत्री आणि विभागीय सचिव तसेच के.वाय. सुरवाडे गुरुजी  नाशिक विभागीय सचिव,  बी.एस. पवार गुरुजी जिल्हा कोषाध्यक्ष,  ए.टी.  सुरडकर गुरुजी  जिल्हा हिशोब तपासणी,  युवराज नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग, प्रा. आनंद ढिवरे कार्यालयीन सचिव,  सुभाष  सपकाळे जिल्हा पर्यटन विभाग सचिव,  बौद्धाचार्य संतोष गायकवाड,  रवींद्र वानखेडे जिल्हा सचिव संस्कार विभाग, भीमराव पवार जिल्हा सचिव  संस्कार विभाग,  विश्वंभर अडकमोल जिल्हा संघटक, डॉ. प्रा. संजय साळवे, विलास तायडे जळगाव,  शरद बोदोडे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष,  वसंत लोखंडे जामनेर तालुका अध्यक्ष, बौध्दाचार्य सध्यान गुरुजी  जामनेर,  अरुण तायडे केंद्रीय शिक्षक,  सुरेश जोहरे जिल्हा संघटक, सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन  अशोक विठ्ठलराव तायडे  बोदवड तालुक्याचे अध्यक्ष तसेच  शांताराम अशोक मोरे तालुका उपाध्यक्ष,  जीवन पालवे बोदवड तालुका कोषाध्यक्ष,  संजय निकम  तालुका सरचिटणीस, आयु.नि. सिंधु निकम महिला विभाग उपाध्यक्ष,  शामराव बोदोडे समता सैनिक दल प्रमुख बोदवड तालुका, साहेबराव धुंदले मुक्ताईनगर तालुका समता सैनिक दल प्रमुख, भास्कर देवराम गुरचळ शहराध्यक्ष बोदवड,  जगन भीमराव गुरचळ शहर उपाध्यक्ष,  ज्ञानेश्वर आधार अडकमोल, बी.बी. तायडे  बोदवड, डी.एस.सुरवाडे , आणि तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य बौद्ध बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये अभिवादन सभेचा कार्यक्रम झाला. दुसर्‍या सत्रामध्ये  झालेल्या श्रामणेर प्रवज्जा विधी कार्यक्रमामध्ये एकूण ३० उपासक यांनी श्रामणेर प्रवज्जा दीक्षा घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here