व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंगमध्ये १४ अभ्यासक्रमांना सुविधा केंद्राची मान्यता

0
25

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी

स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयास शैक्षणिक  सत्र २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून एकूण १४ अभ्यासक्रमासाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. ही सुविधा महाविद्यालयाला   मिळण्यासाठी अद्यावत संगणक   प्रयोगशाळा वायफाय परिसर सुसज्ज इमारत व पुरेशी बैठक व्यवस्था तसेच इतर सर्व सोयी सुविधा अनुभवी तज्ञ मार्गदर्शक कर्मचारी वर्ग या सर्व बाबींची अंकेक्षण करून मान्यता दिली जाते.

शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये या सुविधा केंद्रात मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ एचएमसीटी, मास्टर आर्किटेक्चर, एम बी ए /एम एम एस, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन( एम सी ए), बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (बी ई ), बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ एच एम सी टी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर,  बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (डायरेक्ट सेकंड इयर), बॅचलर ऑफ फार्मसी (डायरेक्ट सेकंड इयर), बॅचलर ऑफ प्लॅनिंग, मास्टर ऑफ प्लॅनिंग या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे. प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष करीता विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणे, मेरिट लिस्ट चेक करणे, विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरणे या सुविधा केंद्रामार्फत केंद्रीय भूत प्रवेश प्रक्रिये संबंधातील अडचणी व मार्गदर्शन या सुविधा केंद्रामार्फत विनामूल्य दिल्या जातात. बुलडाणा जिल्ह्यातील व मलकापूर तालुक्यातील व या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र नसल्यामुळे गैरसोय  होत होती.
परंतु कोलते महाविद्यालयात सुविधा केंद्र उपलब्ध झाल्याने अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

त्याकरिता महाविद्यालयाचे अध्यक्ष डी. एन. पाटील ,प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी परिसरातील विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. सुविधा केंद्रावर प्रवेश प्रक्रियेचे समुपदेशन करण्यासाठी महाविद्यालयातील प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रा. नितीन खर्चे ,प्रा. रमाकांत चौधरी ,प्रा. संतोष शेकोकार ,प्रा. योगेश सुशीर ,प्रा. राजेश सरोदे , संदीप खाचणे , मो. जावेद सह प्राध्यापिका तेजल खर्चे आदी उपलब्ध राहणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here