साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील टॉवर चौकातील प्रसिध्द जनता शॉपीचे संचालक विनोद (बंटी शेठ) शितलदास जवाहरानी (वय ५६) यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ‘कांचन’, ६२, आदर्श नगर, आरटीओ रोड या त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी ९ वाजेच्या सुमारास निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते डॉ.चिमरन जेठवानी व सुरेश जेठवानी यांचे मेव्हणे तर जळगाव शहर पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष शितलदास जवाहरानी यांचे पुत्र तर जनता शॉपीचे संचालक राजेश जवाहरानी यांचे बंधु होत.
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामे करीत असलेले ग्रामरोजगार सेवक गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन ते ही मानधन वेळेवर मिळत नाही तरी शासनाने ह्या ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व महीन्याकाठी विस हजार मानधन द्यावे अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे. सोयगाव तालुक्यात जवळपास ४६ ग्रामरोजगार सेवक कार्यरत असुन ह्या रोजगार सेवकाकडे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे कामे शेततळे, वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल योजना,रमाई घरकुल प्रधाणमंत्री आवास योजना,गायगोठा,कंपारमेंड बिल्डीग,मातीनाला, तलावातील गाळ उपसा, पाणंद रस्ते,वक्षलागवड आदी कामे करण्यात येत असुन ग्रामपंचायतचे रेकार्ड सांभाळणे, मजुरांना काम उपलब्ध करुन देणे,…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास सोयगाव तालुक्यातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातून 25 हजार पदाधिकारी कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असून यासाठी 500 बसेसचे नियोजन मित्र मंडळाने केले असून महिला पुरुषांना स्वतंत्र बस असणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने सोयगाव शहरासह तालुक्यातील सवाळतबारा, फर्दापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात मुले पळविणारी टोळी आली आहे तसेच त्यांची वाहने फिरत आहेत अशी अफवांचे पेव मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाचे माध्यमांतुन नागरिकांमध्ये पसरली आहे. वास्तवीक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात घडलेला नाही. अशा घटनाबाबत पोलीसांना मिळणा-या माहितीला जिल्हा पोलीस दल हे सक्रिय व तत्परतेने जलद प्रतिसाद देत आहे. परंतु पोलीसांचे चौकशी मध्ये या फक्त अफवा असल्याचे निष्पन्न होत आहे. अशा अफवा मध्ये नागरिक हे त्यांचे परिसरात आलेल्या अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा नकरता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी वृत्तपत्रातून बातमी आल्याने पोलीस अधीक्षकाच्या आदेशाची पायमल्ली करून फक्त एक दिवस बंद पाळुन यावल शहरात ठिकठिकाणी जुगार व पन्नीची दारू सुरू झाली. यावल शहरात परिसरात जुगारामुळे पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, असून बनावट केमिकल युक्त पन्नीच्या दारूमुळे तसेच बनावट देशी गावठी दारूमुळे अनेक युवक आणि नागरिकांचे अल्पावधीत निधन झाले. आणि बरेच युवक आजही मृत्यूच्या मार्गावर उभे आहेत.शहरात बोरावल गेट पासून इतर ठिकठिकाणी पन्नीची दारू अनधिकृत पणे खुलेआम विक्री होत आहे,या गंभीर समस्या व प्रकाराकडे,युवक वर्गाच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनाकड़े समाज शासन प्रत्यक्ष बघत असून अर्थप्राप्तीमुळे दुर्लक्ष करीत असल्याने समाजात पीडित कुटुंबांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत…
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी येथील बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस ही वेळेवर सुटत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बस स्थानकात पाऊणतास बस रोको आंदोलन केले. पाऊण तासाच्या आंदोलनावर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पारोळा तालुक्यात ११४ खेडे आहेत या गावांना एरंडोल व अमळनेर विभाग संयुक्तपणे बस सेवा पुरविते यांचा सर्व कारभार अमळनेर विभाग पाहत असतो मात्र दोन्हीही आगार पारोळ्याला नेहमी सावत्रपणाची वागणूक देतात, वेळेवर बसेस पुरवल्या जात नाही, नागरिकांच्या समस्या ऐकली जात नाही, कधी कधी तर लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यावर या आगारांमधील अधिकारी दुर्लक्ष करतात, बस स्थानकात समस्यांचा पाढा हा नेहमीच आहे, त्याच्यावर महामंडळ ठोस उपाय योजना करण्यास अनुकूल दिसत नाही…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकाशी संवाद साधण्याकरिता आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रियाताई सुळे यांचे तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुप्रियाताई सुळे यांचा भव्य असा पुष्पहार घालून तुळजापूर नगरीमध्ये त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे, परिवहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश बिराजदार, भुम-परांड्याचे मा.आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ.वैशालीताई मोटे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नंदकुमार गवारे,…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणा शिवारात मुक्ताईनगर रस्त्यावरील विजय आनफाट यांच्या शेतात अजगर प्रजातीचा सर्प आढळल्याने त्यांनी सर्पमित्र वैभव बच्छाव , कडू बावस्कर , सागर मोरे यांना संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र परिसरात दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन करत आठ फुट लांब बिनविषारी अजगर प्रजातीचा सर्प पकडला. त्यानंतर, आमदगाव येथील वन विभागाचे कर्मचारी डिगांबर पाटील यांना देण्यात आल्यावर अजगराला माळेगांव महाकाली जंगलात सोडण्यात आले. सर्पमित्र वैभव बच्छाव , कडू बावस्कर , सागर मोरे नांदगाव प्रतिभानगर येथील सर्पमित्रांनी याअगोदर अनेक सर्पांना जिवदान दिलेले आहे. यापुर्वी , घोणस , मन्यार असे इतर सर्प पकडले असून अजगर पहिल्यांदाच आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यातील सर्पमित्र वैभव…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी बोदवड ता.बोदवड:-बोदवड तालुक्यात विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सर्व खात्याचे अधिकारी सर्व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत बोदवड तहसील मध्ये आढावा बैठक घेण्यात आली. आढावा बैठक म्हणजे २ ते ३ महिने झाले आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये ऍडव्होकेट सौ रोहिणी खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा करून मतदारसंघ पिंजून काढला त्यामध्ये काही कार्यकर्ते काही नागरिकाच्या ज्या ज्या समस्या होत्या या सर्व लिहिल्या जात होत्या. त्या समस्यांचं निवारण व्हावं त्याकरता ही आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला सर्व अधिकारी वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित होते. त्यावेळेला सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी सामान्य…
साईमत लाईव्ह धानोरा प्रतिनिधी बर्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील किनगाव जवळ विजमंडळाचे कार्यालयासमोर असलेल्या पुला जवळील खड्ड्यांमध्ये १७ रोजी रात्री साडेआठ वाजता एरंडोल तालुक्यातील हनुमंत खेडा येथील तरुणाची मोटरसायकल खड्ड्यांमध्ये ् पडल्याने सदर तरुण जबर जखमी झाला होता. त्याच्या नाका व कानातुन रक्त प्रवाह झाल्याने त्या्ला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या घटनेची दखल तालुक्यातील कोणत्याही अधिकारी व पदाधिकारी नी घेतलीं नाही. रात्रीच सदर तरुणांचा अपघात झाला.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या नाकावर टिच्चून येथील आठ ते दहा तरुणांनी येथिल अपघातास कारणीभूत असलेला खड्डा आजच खडी माती टाकून तात्पुरता का होईना दुरुस्त…