साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी:- नळदुर्ग-आयुष्मान भारत ही आरोग्याशी निगड़ित महत्वपूर्ण योजना असून, केंद्र सरकारने सन २०१८ साली याची घोषणा केली होती. परंतु सन २०१०-११ च्या जनगणनानुसार सर्व्हे केल्याचे समजत आहे. वास्तविक पाहता आताच्या जनगणनेनुसार सर्व्हे होणे अपेक्षित आहे. किंवा या योजनेसाठी स्वतंत्र सर्व्हे होऊन आर्थिक दृष्टया दुर्बल, गरजवंत, गरीब लोकांचा या योजनेत समावेश व्हावा कारण नळदुर्ग शहरातील आताच्या याद्या पाहल्या तर अनेक गरीब कुटुंबाची नावेच या योजनेत नाहीत. हा सर्व्हे नेमका कधी,कसा, कोणत्या आधारे झाला असा प्रश्न नागरिकातुन विचारला जात आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्याना लाभ मिळवून देण्यासाठी स्वंतत्र सर्व्हे व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री…
Author: Saimat
साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी:- नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केले इको फ्रेंडली आकाश कंदील. जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत अशा प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातात. नळदुर्ग येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा शहरांतील सर्वात जुनी शाळा आहे. या शाळेची गुणवत्ता दर्जेदार व चांगली आहे. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्टीपुर्वी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला आकाश कंदील घरातुन तयार करून आणण्यास सांगितले होते. हे आकाश कंदील इको फ्रेंडली असावेत असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतीशय सुंदर व विविध प्रकारचे इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून आणले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अशा वस्तु तयार करण्याची आवड निर्माण होते.…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी (आमीन पिंजारी) कर्तव्य दक्ष वर्ग एक चे अधिकारी हे जनतेच्या सेवे करीता २४ तास सेवेत असतात. मात्र भडगाव येथिल गट विकास अधिकारी यांनी ऑन ड्युटी शासकीय वाहनाने(MH19M0742) कजगावं च्या हॉटेल मधे येऊन भर दिवसा दारू पार्टी केली. आधीच भडगाव पंचायत समितीवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. अशात हा ऑन ड्युटी दारू पार्टी चा प्रकार म्हणजे एखादे प्रकरण रफादफा तर होत नाहीं ना याची शंका आहे. सोबतच वर्ग एक चे ऑन ड्युटी वरिष्ठ अधिकारी ज्या लोकांसोबत दारू पार्टी करत बसले होते ते लोक कोण हा मोठा प्रश्न पडला आहे. नुकताच मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशियाना यांचा भडगाव…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी (भूषण पाटील) T20 World Cup 2022 ला सुरुवात झाली आहे. यावेळी टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. यामध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता. आता दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यापूर्वी महान खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) यावेळी कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे सांगितले. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांच्या यादीत सचिनने भारताचे नावही नोंदवले आहे. एका न्यूज वेबसाईटच्या बातमीनुसार, सचिनने या यादीत भारतासोबतच पाकिस्तानचाही समावेश केला आहे. या दोन संघांशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी…
नागपूर : वृत्तसंस्था भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे वेगळं वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांना ही माहिती दिली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकाऱ्यास वाळू तस्कराकडून शिवीगाळ,धक्का बुक्की करून शासकीय कामात अडथळा आणून अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पळून नेल्याच्या कारणावरून अवैध वाळूची वाहतूक तस्करी करणाऱ्या चालकाविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे या प्रकरणात आणि यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वाहन क्र.नसल्याने आरटीओसह यावल पोलिसांच्या वाहन तपासणीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी गुरुवार दि.13 रोजी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास साकळी येथील कोतवाल विशाल…
साईमत लाईव्ह रावेर प्रतिनिधी रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत या उलट मोठ्याप्रमाणात कर आकारणी लादण्यात आली आहे. या कर आकारणी विरुद्ध यलगार पुकारत नागरिकांनी रावेर नगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे. रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, गटारी नाही व स्ट्रीट लाईट नाही. असे असले तरी नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपट्टीचे अव्वचेसव्वा बिले पाठवून कर आकारणी करण्यात…
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर १०५.९६ ९२.४९ अकोला १०६.१४ ९२.६९ अमरावती १०७.१४ ९३.६५ औरंगाबाद १०८.०० ९५.९६ भंडारा १०७.०१ ९३.५३ बीड १०७.९० ९४.३७ बुलढाणा १०६.८२ ९३.३४ चंद्रपूर १०६.५३ ९३.०७ धुळे १०६.०८ ९२.६१ गडचिरोली १०७.२६ ९३.७८ गोंदिया १०७.५३ ९४.०२ हिंगोली १०७.०६ ९३.५८…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील गेल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार बरसात सुरू आहे. यामुळे नदी, नाले, तलाव धरण, भरले असून, काढणीस आलेले सोयाबीन व काढून टाकलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने शेती शिवारात सर्वत्र पाणी साचून राहिल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले असून काढणीला आलेले सोयाबीन, उडीद पीक पाण्यात गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढून टाकलेले सोयाबीन भिजले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची गरज आहे. सततच्या पावसाने पाणी लागून सोयाबीन पिवळे पडून नुकसान झाले आहे. पूर्वी झालेल्या पंचनाम्याची मदत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे.
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझर पोलिस ठाणे हद्दीतील दिक्षी येथे एका युवकाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली काल गुरूवारी दुपारी 3 वाजेपुर्वी चेतन गोविंद फौजदार वय 20 राहाणार दिक्षी ता.निफाड याने त्याच्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेचे व्रुत समजताच पोलिस उपनिरिक्षक ए बी तोडमल हवालदार जे एम चौघुले,धारबळे, लहांगे ,भास्कर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चेतनच्या म्रुतदेहाचे शवविच्छेदन नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले त्यावेळी फॉरेन्सीक मेडिसिन एक्सपर्ट डॉ एच एन घांगले यांनी दिलेल्या अॅडव्हान्स डेथ सर्टीफिकेटनुसार ओझर पोलिसांनी आकस्मात म्रुत्युची नोंद केली असुन अधिक तपास जितेंद्र चौघुले हे करीत आहे. चेतन हा संदीप फाउंडेशन…