बसमध्ये आरोपी असल्याचे सांगून थांबवली ; चालकाच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा

0
1

साईमत लाईव्ह  मलकापूर  प्रतिनिधी

जामीनावर सुटलेले आरोपी यांनी नियम व शर्तीचा भंग केल्याने ते गावातून मलकापूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून गावातील नागरिकांनी वडजी ते मलकापूर ही बस थांबवून त्या आरोपींना मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिल्याची घटना घडली.

तर हद्दीतील आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले तर बस थांबविल्याच्या कारणावरून चालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील मौजे निपाणा येथील एका प्रकरणामध्ये मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये आरोपींपैकी तीन महिला व दोन पुरुष बळीराम तांदुळकर, विनोद सिताराम तांदुळकर हे न्यायालयाच्या जामीनावर नियम, शर्ती, अधीन राहून बाहेर आलेले होते. त्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे निपाणा येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यातील हे पाच आरोपी  19 ऑक्टोबर रोजी बस क्र.एमएच 06 एस 8037 वडजी ते मलकापूर यामध्ये निपाणा बस थांब्यावरून मलकापूरकडे येण्यास निघाले होते. ते आरोपी न्यायालयाने दिलेल्या शर्ती व अटींचा भंग करीत गावात राहात  असल्याने  त्यांनी सकाळी मलकापूरकडे या बसमध्ये ग्रामस्थांसह निपाणा येथील विनोद रामा थाटे, नंदकिशोर रामसिंह राजपूत यांनी ती बस पोलिसांच्या स्वाधीन केली.

पिंपळगाव – बोदवड रोडवरील मलकापूर शहर नजीक असलेल्या सालीपुरा रोडवर चालक शिवाजी यांनी थांबवून ग्रामीण पोलिसांना माहिती देवून त्यांना ताब्यात घेण्याकरीता कळविले.सदर बस ज्याठिकाणी थांबविण्यात आली ती हद्द गुन्हे दाखल करण्यात आलेले नसल्याने ग्रामीण पोलिसांनी थातूर-मातूर कारवाई करण्याची भूमिका घेतली असता संतप्त ग्रामस्थांनी याविरुध्द रोष व्यक्त करताच ती हद्द शहर पोलिसांची असल्याने त्याठिकाणी शहर पोलिस दाखल होवून त्यांनी सदरची बस मलकापूर शहर आरोपींची शहनिशा करून त्यांना ग्रामीण पोलिस स्टेशनमधील पोलिसांच्या स्वाधीन केले मलकापूर एस.टी. आगाराची बस थांबविल्याने उत्तमराव जगदाळे रा. मलकापूर यांचे  फिर्यादीवरून विनोद रामा थाटे, नंदकिशोर रामसिंह राजपूत यांचे विरूध्द अप.नं. 438/22 नुसार कलम 341, 186, 34 भादंविनुसार गुन्हे दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here