४ लाख ५० हजार चोरी करून  फरार अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

0
15

साईमत लाईव्ह मलकापुर प्रतिनिधी

पोलीस स्टेशन बोराखेडी ता . मोताळा येथील स.पो.नि. विकास पाटील यांनी काही दिवसापुर्वी स.पो. नि . सुखदेव भोरकडे मलकापुर शहर यांना फोनव्दारे कळविले होते की , बोराखेडी पो.स्टेशनला दाखल गुन्हा.क्रं .२६७/२०२२ कलम ४६१,३८०,३४ भा.दं.वि. प्रमाणे कृषि दुकानाचे शटर तोडून ऐन पेरणीचे वेळी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा कृषि मुद्देमाल चोरुन नेल्याच्या गुन्हयातील एक आरोपी आरीफ खान कौसर खान (वय २५ वर्ष )हा मलकापुर शहर हद्दीतील राहणारा असुन तो गुन्हा घडल्यानंतर काही दिवस गाव सोडुन पळुन गेला होता;  मात्र मागील काही दिवसांपासून तो मलकापुर शहरात ये जा करीत होता.

त्यामुळे तो मिळुन आल्यास त्याला पकडुन घ्या आम्हाला त्याला गुन्ह्यात अटक करावयाची आहे, असे कळविले होते . तेव्हा सदरची माहिती पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी राजपुत यांना दिली असता त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर डी.बी. पथकाचे स.पो.नि.सुखदेव भोरकडे आणि डी.बी.टिम सदर आरोपीवर पाळत ठेवून होते .दि. २२ऑक्टो. रोजी फरार आरोपी एका ठिकाणी आला आहे व तो तेथुन लगेच जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचुन डी.बी. पथकाने आरोपीस जेरबंद केले आहे.
सदर आरोपीवर याआधी चोरी , घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत .तदनंतर बोराखेडी पो.स्टेचे स.पो. नि . विकास पाटील यांना आरोपी पकडल्याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी मलकापुर शहर पोलिस स्टेशनला पाठविलेल्या पो.हे.का. आबिद शेख , ना.पो. का . शिवाजी मोरे , पो.का . इंगळे यांचेकडेस पुढील कारवाईकामी सोपविले आहे.

सदरची कार्यवाही सारंग आव्हाड पोलिस अधिक्षक बुलडाणा ,श्रवण दत्त अप्पर पोलिस अधिक्षक खामगांव , मा . अभिनव त्यागी सा. उपविभागिय पोलिस अधिकारी मलकापुर विजयसिंह राजपुत पोलिस पोलिस निरीक्षक  पोस्टे मलकापुर शहर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी सपोनि सुखदेव भोरकडे सोबत पोकॉ. ईश्वर वाघ , पो.कॉ . संतोष कुमावत , पो.कॉ .प्रमोद राठोड , पो.कॉ. आसिफ शेख , पो . कॉ . अनिल डागोर , पो.कॉ गोपाल तारुळकर यांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here