गोडगाव येथे होणाऱ्या जापानुष्ठान ची तयारी जोरात सुरू

0
2

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या श्री.क्षेत्र गोंडगाव येथे होणाऱ्या जपानुष्ठान ची तयारी जोरात सुरू झाली असुन कजगाव पारोळा मार्गावर उभारण्यात येत असलेले विविध मंडप प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेन श्री. क्षेत्र गोंडगाव ता.भडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा दि.२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असं सप्ताहभर धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन यात लाखो बाबाजी भक्त सह भाविक सहभागी होणार आहेत.

बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे तसेच कै. विजकुमार सुदर्शन आहिरे यांचे संकल्पप्रती बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरणाचा श्री. क्षेत्र गोंडगाव ला प्रथमच सौभाग्य प्राप्त झाले आहे तसेच बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण महाराष्ट्रात श्री. क्षेत्र वेरूळ, श्री. क्षेत्र ओझर,श्री. क्षेत्र पुणतांबा व श्री. क्षेत्र गोंडगाव आश्रमात मोठ्या उत्साहात साकार होणार आहे या चारहि ठिकाणी राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा २०२२ या नावाने संपन्न होणार आहे या सोहळ्यात पुरुष व महिला जपानुष्ठान, एकनाथी भागवत पारायण,३३ कुंडी यज्ञ ,अखंड नामजप, प्रत्येक तालुक्याचे अखंड नंदादीप, हस्तलिखित जप साधना,कीर्तन सप्ताह इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे या धर्म सोहळ्याला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे
राजस्थानी कारागिरांनी बनविले.

देखणे यज्ञ मंडप
पाच ते सहा हजार स्केअर फुट मध्ये बांबु च्या कांबड्या व बांबु सुतच्या च्या धाग्याने यज्ञ मंडप उभारण्यात आले आहे राजस्थान येथुनआलेल्या वीस कारागिरांनी पंधरा दिवसांत हे देखणे यज्ञ मंडप उभारले या साठी लागणारे सारे साहित्य राजस्थान येथुनच मागविण्यात आले होते कजगाव पारोळा मार्गावर उभे राहिलेले हे यज्ञ मंडप या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या चे लक्ष वेधून घेत आहे
कजगाव पारोळा मार्गाच्या एका बाजूला यज्ञ मंडप तर दुसऱ्या बाजुला साधारण बारा ते पंधरा हजार स्केयर फुट चे मोठे मंडप व दोघ बाजुला काहि मंडप तर तेथुन काहि अंतरावर तयार करण्यात आलेले हेलिपॅड हे भव्यदिव्य देखावा साऱ्यांचेच लक्ष केंद्रित करून घेत आहेत.

दि.११ रोजी या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची पहिली बैठक श्री. क्षेत्र गोंडगाव येथे घेण्यात आली होती यात वेरूळ आश्रमाचे विश्वस्त. शिवाकाका अंगुलगावकर यांनी धर्म सोहळ्यात कश्या प्रकारे नियोजन करावे याची माहिती दिली होती भव्यदिव्य सोहळ्याच्या वेगवेगळ्या कमिटी स्थापन करत त्यांना कामाची जबाबदारी सोपविण्यात आली गोंडगाव गावातील भक्तभक्तांनी स्वेच्छेने धर्माची घोषणा करून स्वेच्छेने कामाचे वाटपही करून घेतले होते राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश सुदर्शन आहिरे व मुख्य कमिटीने उपाध्यक्ष माजी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष समाधान पाटील हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here