कजगाव येथे भडगाव तालुका यु-डायस प्लस ची कार्यशाळा संपन्न

0
3

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथे भडगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील १६४ शाळांच्या मुख्याध्यापकांची यु-डायस प्लस ची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली .

भडगाव शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याच्या या कार्यशाळेस केंद्रप्रमुख कोमलसिंग पाटील, अशोक संतोष खेडकर, एम आय खान, नंदकिशोर बैरागी, रवींद्र सोनवणे, रावसाहेब पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक तंत्रज्ञान शिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय पोषण आहार लेखा परीक्षण संदर्भात सुभाष उगले यांनी सखोल मार्गदर्शन केले .

एम आय एस कॉर्डिनेटर योगेश अहिरराव व किशोर पुजारी यांनी यु-डायस प्लस ची माहिती भरताना येणाऱ्या अडचणी व झालेल्या नवीन बदल बाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी v school, स्कूल १६ कलमी कार्यक्रम, बाला उपक्रम ,शाळाबाह्य सर्वेक्षण बालरक्षक, निपुण भारत अंतर्गत माता गट स्थापन यासह शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या सर्वच उपक्रमांच्या धावता आढावा घेत मार्गदर्शन केले .या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील साधन व्यक्ती ,समावेशित तज्ञ व विशेष शिक्षक सर्वांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here