कजगाव ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू, अधिक तरुण वर्ग इच्छुक

0
1

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे यंदाची निवडणूक ही लोकनियुक्त सरपंच निवड पद्धतीने होणार आहे मागील पंचवार्षिक निवडणूकही लोकनियुक्त सरपंच निवडणूकीतून झाली होती आता ही कजगावचा सरपंच हा लोकनियुक्त पद्धतीने निवडला जाणार आहे सतरा ग्रा प सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच अश्या अठरा जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे.

लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेकांनी आता पासूनच कंबर कसली आहेत आजी माजी सरपंचासह आजी माजी सदस्य अनेक तरुण व अनेक उद्योजक ग्रामस्थ ह्या लोकनियुक्त च्या स्पर्धेत उतरण्याचे संकेत देत आहेत आगामी निवडणुकीत अनेक मातब्बर आपली राजकीय ताकत दावावर लावण्याची शक्यता आहे सरपंच पदासह सतरा सद्स्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात मोठे महत्व आहे.

त्यामुळे भडगाव तालुका व पाचोरा मतदार संघातील अनेक राजकीय पदाधिकारी हे ह्या निवडणुकीत अप्रत्यक्ष सहभाग घेऊ शकतात तर अनेकांना बाहेरून राजकीय ताकत पुरवली जाऊ शकते असा अंदाजही लावला जात आहे लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण हे खुला प्रवर्ग (जनरल) चे असून दिनांक १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दिनांक २० डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच घरभेटी प्रत्यक्षात संपर्क व अनेक छोट्यामोठ्या बैठकांना सुरुवात झाली आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या कजगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत गावाचा सरपंच कोण? हे येत्या काही दिवसांत समजणार असले तरी आता पासूनच गुलाबी थंडीची गरम चाहूल लागायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गुलाबी थंडीला राजकीय हवा गरम करणारच हे आता पासूनच दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here