साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अध्यात्म शिरोमणी संत जगदगुरू जनार्दन स्वामींच्या ३३ व्या पुण्यमरणाचे आयोजन दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत करण्यात आले होते. तब्बल आठ दिवस हा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक ५ रोजी कार्यक्रमाची सांगता असल्याने तब्बल एक लाख भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात आठ दिवसात लाखो भाविकांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व परमपूज्य बाबाजींचे आशीर्वाद घेतले तब्बल आठ दिवस कथा प्रवचन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रम हा १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला आठ दिवसात अनेक वेळा शांतिगिरी महाराजांनी कार्यक्रम स्थळी भेट…
Author: Saimat
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी पंचवटी येथील कल्पदीप क्लासेस चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम या स्नेहसंमेलनात सादर झाले. तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.पंचवटी येथे गेल्या ९ वर्षांपासून कल्पदीप क्लास ज्ञानदानाचे कार्य करीत असून या क्लास मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत. सध्या क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून क्लास चे व नाशिक चे नाव उज्ज्वल करावे, असे क्लास चे संचालक स्थानिक मयूर जाधव व प्रितेश जाधव यांचे वडील यांनी यावेळी सांगितले. कल्पदीप क्लास च्या वार्षिक स्नेहसंमेलनास क्लास चे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लोकनृत्य, कोळी नृत्य व…
साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गोंडगाव येथे अत्यंत बहुप्रतीक्षेत असलेल्या संत जगदगुरू जनार्दन स्वामी यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणानिमित्त होत असलेल्या राष्ट्रनिर्मान धर्म सोहळ्याला आज २८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे हा कार्यक्रम ५ डिसेंबर पर्यंत होणार आहे. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम व उत्साहात ह्या बहुप्रतीक्षेत असलेल्या सोहळ्याला सुरुवात झाली जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडत आहे १००८ स्वामी शांतिगिरजी महाराज यांचे हेलिकॉप्टर द्वारे गोंडगाव नगरीत आगमन झाले अत्यंत वाजत गाजत ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले सुरुवातीला हेलिकॉप्टर मधून कार्यक्रम स्थळाची पाहणी व…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने सोमवारी (दि.२८) श्रमदानातून खडकी नदीवर वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.गावपरिसरात आगामी उन्हाळ्यात भूगर्भातील पाणी पातळी स्थिर राहावी यासाठी वनराई बंधारा उभारण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे यांनी सांगितले गाव विकासा सोबतच जरंडी ग्रामपंचायत आता पाणी आडवा,पाणी जिरवा या शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाकडे वळाली आहे. त्यासाठी खडकी नदीवर श्रमदानातून ग्रामस्थांनी उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे सोमवारी सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी सरपंच वंदनाबाई पाटील, उपसरपंच संजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,मधुकर सोनवणे,प्रकाश पवार,अमृत राठोड, बनेखा तडवी,आदींची उपस्थिती होती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे, लिपिक संतोष पाटील,अनिल शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला.
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहराजवळील गलवाडा(अ) शिवारात गट क्र-१४४ मधून अवैध उत्खनन करतांना दोन ट्रक्टर व एक जे सी बी रंगेहाथ पकडल्याची कारवाई महसूल च्या अवैध गौण खनिज पथकांनी रविवारी केली आहे या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर व जे सी बी सोयगाव तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.या कारवाई मुळे अवैध गौण खनिज वाहतूक दारांची धाबे दणाणले आहे. सोयगाव महसूलचे भरारी पथकाला गलवाडा(अ) शिवारातील गट क्र-१४४ मध्ये अवैध माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक घटनास्थळी पोहचले असता,त्या ठिकाणी अवैध मातीचे जे सी बी च्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना पथकांनी रंगेहात पकडून दोन ट्रॅक्टर…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी खरिपाच्या हंगामाचे उत्पन्न हाती नाही, त्यातच खरीपासाठी काढलेले खासगी व बँकेच्या कर्जाचे ओझे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकरी पुत्राने सोमवारी सकाळी वेताळवाडी शिवारातील सैलानी बाबा टेकडीवर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. गोपाळ शेनफड सोनवणे, वय २७ वर्ष, रा. सोनसवाडी, असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे त्याच्या कुटुंबियांच्या नावे वेताळवाडी शिवारात गट क्र-७३ शेती असून या वर्षीच्या खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचे इतपतही उत्पन्न हाती आले नसून रविवारी रात्रीपासून कर्जाच्या विवंचनेत असलेल्या या शेतकरी पुत्राने खरिपाची उत्पन्न हाती नाही त्यातच कर्ज फेडण्याच्या चिंता…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी भारत सरकार संचालित युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगांव यांचा वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन, जळगांव या संस्थेस “जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार-२०२०,२१ पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा पर्यावरण व युवा कल्याण साठी केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने गौरविण्यात आले. क.बहिणाबाई चौधरी उ.म.वि. या ठिकाणी संविधान जनजागृती कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी.उ.म.वी.चे कुलगुरू श्री.एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश श्रीमती एस.ए.कुलकर्णी मॅडम यांचा हस्ते संस्थेच्या युवा अध्यक्षा रोशनी शेख व संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी(उमवी)चे कुलगुरू एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश…
साईमत लाईव्ह फर्दापुर प्रतिनिधी अवैधरित्या गायीची वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात रविवार ( दि.२७) रोजी औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ झाला.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला तिन जणांवर गुन्हा दाखल . या बाबत सविस्तर माहिती अशी की, गायींची अवैधरित्या वाहतूक करणारी पिकअप गाडी क्रं. एम.एच.२० इ.एल.९९६५ सुसाट वेगाने चालणाऱ्या गाडीचा औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ अपघात झाला. गाडीने डिव्हायडरला जोराची धडक दिली.चालका सह अन्य दोन दारुच्या नशेत आढुन आले.यात तिघे जण गंभीर जखमी झाले.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला आरोपी मनोज शेनफडु शिरसार ( ३०), सिल्लोड,बाळु विठ्ठल सोनवणे (३६) व विलास…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी सोयगाव तालुक्याला दिला असून याबाबतचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली. तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने ३६ हजार ४६८ हेक्टर वरील पिके बाधित झाली होती या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले होते त्यानुसार नुकसान झालेल्या ३२ हजार ९८० शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ४९ कोटी ५९ लक्ष ६४ हजारांचा निधी तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे त्यामुळे दहा दिवसात ३२ हजार ९८०…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सोमवार दिनांक २८, नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे तीन टेबलावर सहा कर्मचारी नाम निर्देशनपत्र स्वीकारतील अशी माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. सोयगाव तालुक्यात वरखेडी(खु)ठाणा, सावरखेड- लेनापूर,घोरकुंड,कंकराळा-रावेरी आणि वाडी-सुतांडा- नायगाव या पाच ग्रामपंचायत साठी सोमवारी दिनांक २८ ते २ डिसेंबर पर्यंत नाम निर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत आहे दरम्यान या पाचही ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असून पाच पैकी वरखेडी ठाणा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला, सावरखेडा सर्वसाधारण महिला आणि वाडी नायगाव सर्वसाधारण महिला सरपंच पद राखीव झाले असून या पाच ग्रामपंचायतीसाठी तुरस वाढणार आहे कंकराळा-रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमातीकडे राखीव झाले…