साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी
कजगाव पारोळा मार्गावरील कजगाव च्या उड्डाणपुलावर रीक्षा व ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात रीक्षा ड्रायव्हर सह दोन महिला जखमी झाल्या जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बाबत वृत्त की कजगाव येथील रहिवासी प्रविण सुपडु महाजन हे आपल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१९ एक्यू ७४५५ ने शेतात जात असतांना कजगाव पारोळा मार्गावरील श्री.चक्रधारस्वामी रेल्वे उड्डाणपुला वर कोळगाव कडुन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.१९ सी.झेड ६३०१ ने जोरदार धडस दिल्याने यात रिक्षा ड्रायव्हर प्रविण सुपडु महाजन यांचे दोघ पाय फ्रॅक्चर झाले तर दिपाली प्रविण महाजन व सुनिता राजेंद्र वाघ या दोघ महिलांना डोक्यास मार लागल्याने त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे रिक्षा व ट्रॅक्टर ची धडस इतकी जोरात होती त्यात पारोळा कडे जाणाऱ्या रिक्षाचे तोंड कजगाव कडे झाले.
पुलाच्या कठड्यामुळे रीक्षा व ट्रॅक्टर दोघ त्यात अडकल्या मुळे वाचले अन्यथा दोघ वाहन सरळ पुलाच्या खाली गेली असती यात मोठी जीवितहानी झाली असती.