साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
बोदवड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाला निवेदन देण्यात आले. बोदवड शहरासह तालुक्याभरात कडूनिंब या वृक्षावर असंख्य अशा अळ्या पडून तालुका भर कडूलिंब वृक्ष अक्षरशः बोडखे करून सोडले आहे यावर उपाय योजना करावी व वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्रमुख वृक्षापैकी कडूनिंब हे महत्वपूर्ण वृक्ष असून आज ते वृक्ष अक्षरशा बोडके करून सोडलेले आहे. ज्याकडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून शेती व औषधी उपयोगी येतो त्याच कडुनिंब वृक्षाला आज असंख्य अळ्या पडून फस्त करीत आहे. यावर संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून उपाययोजना करावी याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनंत भाऊ वाघ शहर अध्यक्ष शैलेश वराडे संघटक गणेश सोनोने पवन पाटील गणेश मुलांडे आबा भाऊ माळी उपस्थित होते.