साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
जिल्हाभरात वार्याच्या वेगासारखा व्हायरल झालेला शिरसाळा मारोतीरायाचा फोटो 24 तासात दहा लाखांहून अधिक भाविकांपर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचला. परंतु , व्हायरल झालेल्या फोटोत मुर्तीच्या सावलीत मारोतीराराचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र नेमके कोणी काढले ? हा फोटो बनावट तर नाही ना ? अशी विचारणा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. या घटनेच्या दुसर्या बाजुचा शोध घेत नेमके सत्य काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न छायाचित्र काढणाऱ्या जळगांव येथील जिजाऊ नगर येथील रहिवाशी तरुण चेतन बाविस्कर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
मुर्तीच्या सावलीत मारोतीरायाचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र व्हाट्सअप वर एका तरुणाचे स्टेटस लावलेले असल्याचे निदर्शनास आल्यावर ते छायाचित्र शिरसाळा मारोतीरायाचे सेवक या फेसबुक पेज वर एडमिन अमोल व्यवहारे यांचेकडून टाकण्यात आले. त्यानंतर, परिसरातील व्हाट्सअप वर शेअर केल्यानंतर हे छायाचित्र असेलेली पोस्ट वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या 24 तासांत दहा लाखांहून अधिक बजरंग भक्तांपर्यंत हि घटना पसरली. त्यानंतर , रात्रीच्या सुमारास शिरसाळा मारोतीरायाचे सेवक या फेसबुक पेजवर संपर्क क्रमांक लिंक असल्याने त्यावर चेतन बाविस्कर या तरुणाचा फोन आला. सोशल मिडियावर मारोतीरायाचा हे छायाचित्र व्हायरल झालेले आहे हे कोणी काढले असे त्यांचेकडून विचारण्यात आले. प्रत्युत्तरात ; त्यांना सदरील प्रकार सांगितला असता त्यांचेकडून हा फोटो मि काढलेला आहे असे सांगण्यात आल्यावर फोटो काढणार्याचा शोध लागला.
मित्र सोबत बसलेले असतांना फेसबुकवर आपण काढलेला फोटो व्हायरल होत आहे असे त्यांनी सांगितल्यावर संपर्क करण्यात आला. सर्वप्रथम त्यांचे आभार मानत त्यांना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याची माहिती दिली त्यानंतर त्यांचेकडून घटनाक्रम जाणून घेतला. याबाबतची माहिती श्री. जागृत शिरसाळा मारोती ट्रस्टचे लिपिक ऊमेश पाटिल , योगेश पाटिल यांना देण्यात आली. ईच्छापुर्ती हनुमंतराय म्हणून जागृत शिरसाळा मारोती प्रसिद्ध आहे.
चेतन बाविस्कर हे कल्याण येथून राहते घर जळगांव जिजाऊ नगर येथे आल्यावर त्यांनी शिरसाळा मारोतीरायाचे सलग पाच शनिवार दर्शन घेण्याचा निश्चय केला. दिनांक 29 रोजी जळगांव येथून सकाळी 4:30 वाजता शिरसाळा मारोती येथे निघाल्यावर दर्शनासाठी रांगेत लागून सकाळी 6:30 वाजता दर्शन झाले. त्यानंतर मारोतीच्या मुर्तीचा फोटो काढल्यानंतर परतीच्या प्रवासाठी निघतांना बाहेरच्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ व्हाट्सअप ,इन्स्टाग्राम स्टेटस टाकत असतांना मुर्तीमागच्या सावलीतं मारोतीरायाचे प्रतीरुप दिसत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आईचा काॅल आला आणी तुला साक्षातः हनुमंतरायाने दर्शन दिल्याचे सांगितले. यावेळी सोबत असलेले ; चेतन बाविस्कर, वैभव भारूडे , आकाश पाटील , तेजस भारूडे , अक्षय जगताप , जयेश कांखरे , योगेश कोळी हे परत मंदिरात गेले. परंतु , पुनच्छ: त्यांना अश्या स्वरुपातील सावलीत मारोतीरायाचे प्रतीरुप दिसले नाही. नंतर , सलग पाच शनिवार करत असतांना असे कधीही निदर्शनास आले नसल्याचे चेतन बाविस्कर यांनी सांगितले. मूर्तीजवळील हार गाडीला घेतला असता बोदवड भुसावळ रोडवर वानर मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मृत वानर रस्त्याच्या बाजूला नेऊन त्यावर मंदिरातील हार टाकुन व टाकुन अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे चेतन बाविस्कर यांनी कळविले.