Author: Saimat

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी  कोरोनाकाळाच्या दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरू होणाऱ्या येथील खंडेराव महाराज मैदानात हळूहळू मनोरंजनाचे ( रहाट पाळणे, मौत का कुआ, ट्रेन, चक्री आदि) साहित्य घेऊन आगमन होत आहे. येथील ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवार २९ पासून सूरू होत आहे पांच दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व ( घोडा ) हा बारा  गाडे ओढतो आणि चालत्या फिरत्या गाड्यांवर फिरणाऱ्या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हारमल्ल कसरती करतात आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळणीने होणारा सोनेरी परिसर  हे असते त्यामुळे दोनशे अडीचशे वर्षाची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील चाळीस वाडयावस्त्याचे ग्रामस्थ दृष्य डोळ्यात साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात.…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी राज्य मार्ग 238 उस्मानाबाद ते उजनी या रस्त्याचे काम मागील जवळपास 3 वर्ष झाले चालू आहे सदरील काम संथ गतीने सुरू आसून त्यातील एकच बाजूचे काम झाले असून चालू असलेल्या कामात मानवी नित्ती मूल्याची पायमल्ली करून काम होत असल्याचे दिसून येत आहे. काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी सूचना फलक लावले नाहीत तसेच ज्या ठिकाणी पुल आहेत त्या ठिकाणी तर एकाच बाजूचे काम झाल्याने रात्रीच्या वेळेस दोन वाहने समोरासमोर आली असता सूचना फलकाच्या अभावामुळे पुलाचे कठडे दिसून न आल्याने अपघात होत असून यास जबाबदार कोण अशी चर्चा लोकामधून दबक्या आवाजात होताना दिसून येते तरी या…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी आरोपी सोबत संगमत पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भडगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या विरुद्ध राज्य मानवी हक्क न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी चे आदेश देत उतेकर यांना 50 हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महिलेची फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्या न्यायालयात खटला (४३०/२२) दाखल केला होता. याप्रकरणी निरीक्षक उतेकर यांनी कायद्याचे उल्लंघन व अभीव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवून अवमान करणे फिर्याद दाखल करण्यास नकार देणे, पदाचा दुरुपयोग करणे असे प्रकार आयोगाच्या चौकशी समोर झाले . त्यामुळे आयोगाने निरीक्षक उतेकर यांना 50…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ झाला असून या महिन्यात शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात. ईच्छा पुर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शनिवारी भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील गोपीभाऊ राजपुत यांनी ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत अडीच किलो चांदीचा गदा शिरसाळा मारोतीराया चरणी अर्पण केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण बजरंग भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल, शिवसेना जळगांव महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे , नगरसेवक तथा साईसेवक पिंटुभाऊ कोठारी , शेखर भाऊ सोनवणे यांच्यासमवेत साई मित्र परिवार मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होता.

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी आयशर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने ३१ वर्षीय मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावरील करंजी पुलाजवळ शुक्रवार,  सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर गाडी क्र. एम. एच. २० ईएल- २११९ने पिंपळगावहून बेटावदकडे जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.०५- टी १२१० ने जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार भगवान विश्वनाथ उगले (वय ३१) रा. बेटावद खु. ता. जामनेर हा युवक जागीच ठार झाला.अपघात घडताच आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसात आयशर चालक आकाश बनकर वय २० रा. पान वडोद ता.सिल्लोड जि .औरंगाबाद याच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३०४(अ),२७९,४१९,सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी  सविधांनामुळेच लोकशाही बळकट झाली आहे. सविधांनामुळेच समाजाचा सर्वांगिण विकास झाला आहे. असे प्रतिवादन ॲड. अर्जुन पाटील यांनी आज सविधांन दिनानिर्मित बोदवड न्यायालयात आयोजित कार्यक्रमात केले. आज बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात सविधांन दिनानिर्मित सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात सविधांन उद्देशिकाचे ॲड. अर्जुन पाटील यांनी उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व सर्वाना सविधांनाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. सविधांनास नमन व पुजन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोदवड वकिल संघाचे उपाध्यक्ष धनराज प्रजापती यांनी “सविधांन आणि न्यायालयाचे महत्व” या विषयावर अभ्यासपुर्ण विचार मांडले. तसेच ॲड. के.एस. इंगळे यांनी सविधांनवर गाणे…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरीकांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शनिवारी शहीद दिनानिमीत्त रक्तदान शिबिर आयोजीत करून अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यातून 44 बाटल्या रक्त संकलीत झाले. यासाठी जीवन सुरभी ब्लड बँकेेचे सहकार्य लाभले. देशाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शहीद दिनानिमीत्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव जॉगिंग असो. व चाळीसगाव सायकल गृपच्या वतीने पोलीस स्टेशन आवारात रक्तदान शिबिर आयोजीत केले होते.प्रारंभी 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एन के वाकलकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, प्रितेश…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी भारतीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम लोकशाही संविधानामुळेच असल्याचे सांगितले. संविधान निर्मात्यांचे उपकार म्हणून हा दिवस लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.तसेच संविधानांचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची कृतज्ञता त्यांनी मनोगतातुन व्यक्त केली.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अजय काटे,विभाग प्रमुख प्रा.मुकुंद अहिरे तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा.नितीन नन्नावरे यांनी संविधान दिवसाचे महत्त्व विशद केले.तर आभार प्रा.अहिरे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील यांनी केले.या कार्यक्रमात मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी नानसो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सतिष पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.राजेंद्र भोसले यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले. शाळेतील शिक्षिका श्रीमती.सरला महाले यांनी संविधान वाचन केले. श्री.राजू पाटील व श्रीमती अर्चना मोरे यांनी संविधान दिनाविषयी माहिती सांगितली. तसेच शाळेत संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद पाटील तर आभार श्री.रमाकांत कापडणिस यांनी व्यक्त केले.

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यांच्या “विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना”, अंतर्गत बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज यांच्या वतीने व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, चाळीसगाव, इंडियन मेडिकल असोसिएशन चाप्टर चाळीसगाव. यांच्या सहकार्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वैद्यकीय शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा आयएमए चाळीसगाव चे अध्यक्ष मा. डॉ. विनोदजी कोतकर हे होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये चाळीसगाव नगरीतील सुपरिचित तज्ञ डॉक्टर डॉ. सुजित वाघ अध्यक्ष जेपीए चाळीसगाव , डॉ. सुधनवा कुलकर्णी, डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. प्रशांत सिनकर, डॉ. हर्षल सोनवणे, डॉ. किरण…

Read More