Author: Saimat

साईमत लाईव्ह जळगाव विशेष प्रतीनिधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता औटी यांच्याकडे जळगाव विभागातून मंजुरीसाठी गेलेल्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी कागदपत्रे पाठविली जातात. या कामांच्या प्रस्तावातील  सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कामांना मंजुरी न देता विकासाला अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा अजब प्रकार मुख्य अभियंता  औटी (नाशिक) यांच्याकडून होत आहे. त्यातल्या त्यात विरोधी पक्षाचे आ. अनिल भाईदास पाटील यांच्या आर. बी. पाटील फर्मच्या कामांना मात्र मजुंरी दिल्याने मुख्य अभियंता औटी यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना डिवचल्याच्या कार्यशैलीची चर्चा मात्र रंगली आहे. मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यशैलीने संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री ना. गिरीष महाजन  यांनी…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जापानचे तोकुशिमा विद्यापीठ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठाच्या नऊ विद्यार्थ्यांनी समर स्कूल  २०२२ उपक्रमांतर्गत पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाचे अध्यक्ष आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. ए. एम. महाजन यांनी प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाव्दारे होणा-या पुढील उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व अधिष्ठाता प्रा. ए. पी. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समर स्कूलसाठी विद्यापीठाचे यशल नारखेडे, अभिषेक चौधरी, मनीष…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश चित्रातुन देता येतो. ’चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे सकारात्मक संदेश देणारे आहे. कुठल्याही गावाची ओळख ही तेथील कलावंतांमुळे होते यासाठी जळगाव मधील कलावंत प्रयत्न करत असल्यानेच आम्हाला सर्वांना कलेविषयी जिव्हाळा आहे, अभिरुची आहे आणि कलावंताविषयी नितांत आदरभावना असल्याचे सांगितले. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रद्धेय मोठ्याभाऊंना समर्पित असलेल्या ’चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खान्देशातील चित्रकार प्राचार्य राजू महाजन, राजू बाविस्कर विकास मल्हारा, विजय…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी अल्पवयीन विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय दिलीप बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा अजय बाविस्कर हा सुमारे १५ दिवसापासून पिडीतेचा शाळेत जातांना व येतांना पाठलाग करत होता. त्यामुळे पिडीतेने शाळेत जाणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर अजय बाविस्कर हा पिडीतेचा दुकानावर किंवा चक्कीवर जाता येता देखील पाठलाग करत होता. याबाबत पिडीतेने आपल्या आजीला सर्व हकीगत सांगितली होती. एकेदिवशी पिडीता आपल्या नातेवाईक मुलीसोबत घराच्या समोर अंगणात बैंडमिंटन खेळत होतो. तेव्हा तेथे अजय बाविस्कर आला आणि त्याने वाईट…

Read More

साईमत लाईव्ह पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, ग्राहक फाउंडेशन साक्री तालुका , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर च्या वतीने व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक माननीय श्री. कांतीलालजी जैन साहेब ,माननीय श्री. सुभाषजी बसवेकर साहेब, व अॅड. श्री. चंद्रकांत एशीरावसाहेब यांच्या आदेशानुसार जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवता जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले . कर्म. आ.मा पाटील विद्यालयाचे उपाध्यक्ष माननीय श्री. सुरेंद्रदादा मराठे साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे साहेब ,श्री. ए बी मराठेसर ,प्राचार्य श्री. मनोज बिरारीसर व श्री. संजीव खैरनार साहेब, श्री.प्रशांत अग्रवाल साहेब यांनी हिरवे झेंडे दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. रॅली कर्म. आ.मा…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी दुसखेडा ता.यावल येथील तकारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदाराविरुद्ध नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष शशिकांत नारायण साळवे, वय-54, सहाय्यक सहकार अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जळगाव वर्ग-3 रा.मंगलमुर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ, जळगाव यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी सन 2013 मध्ये दुसखेडा ता.यावल येथील गट क्रं.१६५ मधील ९७ आर इतकी…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझर शहर तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ओझर शहरातील श्री संताजी मंगल कार्यालय येथुन रथावर जगनाडे महाराज यांची प्रतिमा व भव्यदिव्य मुर्तीची समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली, प्रारंभी मारुती वेशी पासुन शिवाजी चौक, मेनरोड, प्रियदर्शिनी शाँपिंग सेंटर ,महात्मा फुले चौक ,भगवा चौक,तांबट गल्ली, माधवराव पहिलवान चौक, मल्हार चौक, चाँदनी चौक, राजवाडा ,तेली गल्ली ,महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद रोड, तानाजी चौक येथुन मिरवणूकीची सांगता करण्यात आली. श्री संताजी महाराज मंगल कार्यालय येथे किर्तन भोलेहर भजनी मंडळ यांनी सादर करीत, श्री संताजी महाराज…

Read More

साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी सर्वसाधारण शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पादन घेतले. परिसरात एकरी सरासरी ७० ते ७५ टन उत्पादन घेतले जाते. पण या सरासरीच्या गणिताला बगल देत चिंचोली भुयार, ता. उमरगा येथील प्रयोगशील शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पन्न घेतले. अमर पवार यांना वडिलोपार्जित २० एकर शेती असून शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी वकिली व्यवसायाला राम-राम ठोकत शेत व्यवसाय करण्याचा छंद बांधला. या वर्षी साखर कारखान्याचे बायलर पेटल्यानंतर ऊसतोड सुरू झाली आणि अमर पवार यांनी एकरी १०४ टन ऊस काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी एकरी ७० ते ७५…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.८ गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव शहरातील पंचायत समिती आवार,व छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक परिसर,सोयगाव न्यायालय परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,व सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनाजी खंदारे,डॉ.आबेद शेख,सोयगाव होमगार्ड पथाकाचे प्रभारी प्रमुख कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे सह आदी. होमगार्ड यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.तसेच यावेळी सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश अमोल इंगोले यांनी होमगार्ड वर्धापन दिनाच्या होमगार्ड संघटने विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी – फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) व अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने शेतमाल निर्यात संधी या विषयावर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पत्रकार भवन येथे बुधवारी (ता. 7) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी विनामूल्य होती. आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत आमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला, असा सूर शेतकर्‍यांमध्ये उमटला. शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा महाव्यवस्थापक चेतन पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, कनिष्ठ सहाय्यक संचालक निकेतन भोसले, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…

Read More