सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठाच्या नऊ विद्यार्थ्यांचा ‘समर स्कूल  २०२२’ उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण

0
23

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

जापानचे तोकुशिमा विद्यापीठ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठाच्या नऊ विद्यार्थ्यांनी समर स्कूल  २०२२ उपक्रमांतर्गत पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
या विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाचे अध्यक्ष आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. ए. एम. महाजन यांनी प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाव्दारे होणा-या पुढील उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व अधिष्ठाता प्रा. ए. पी. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समर स्कूलसाठी विद्यापीठाचे यशल नारखेडे, अभिषेक चौधरी, मनीष पाटील, भुषण देसले, हेमांगी चौधरी, प्रेरणा गरुड, कुणाल पाटील, जगदीश पाटील आणि यश वखारकर या नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. यापैकी २०२३ मध्ये तोकुशिमा विद्यापीठात होणा-या स्प्रिंग स्कूल  २०२३ साठी यशल नारखेडे आणि हेमांगी चौधरी या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना प्रत्यक्षात तेथे जाण्याची संधी मिळाली आहे. तोकुशिमा विद्यापीठाचे प्रा. पंकज कोईनकर, प्रा. तोशिहिरो मोरिगा व प्रा. मिकितो येसुजावा यांनी या समर स्कूलचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधक सुमित पाटील यांनी केले व प्रा. डी. जे. शिराळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here