साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील दत्तात्रय सोनार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनार यांना पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावर सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीवर नियुक्ती मिळाली आहे. सोनार यांनी यापूर्वी जळगाव. भुसावळ. मेहुनबारे. नगरदेळा. चाळीसगाव. अश्या विविध ठिकाणी सेवा दिली आहे पोलीस प्रशासनातील एक शिस्तप्रिय पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे यापूर्वी पोलीस प्रशासनात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांचा अनेक वेळा सन्मान झाला आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या प्रयत्नाने व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांच्या आदेशाने सदरील नियुक्ती…
Author: Saimat
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी मेहुणबारे ता. चाळीसगाव परिसरातील एका गावातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिडीत विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळेच्या डयुटीवर जात असतांना निखील वसंत कोळी याने तुम्हाला गाडीवरून सोडून देतो, असे बोलून तू माझ्या सोबत लव्हशिप कर, असे बोलून विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अनवर कलींदर हे करीत आहेत.
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी अमोल सुभाष देवरे हा एकतीस वर्षीय तरुण दिनांक १२ डिसेंबर पासून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्यामुळे त्याचा आता पर्यंत सर्वत्र शोध घेतला असून तो कुठेही मिळून आला नसल्याने भडगाव पोलीस स्टेशनला त्याची बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. त्याचे वर्णन शरीराने सळपातळ. उंची पाच फूट. रंगाने सावळा.उजव्या हाताच्या पंजाजवळ A असे गोंधले आहे. केस काळे पांढरे. चेहरा लांबट. अंगात राख्या कलरचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट.पायात काळ्या रंगाची चप्पल.असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे वर्णन आहे.बेपत्ता झालेल्या तरुणाचे भाऊ अनिल सुभाष देवरे यांनी भडगाव पोलीस स्टेशनला जाऊन हरवल्याची नोंद केली…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी आपल्या लेखणीच्या बळावर सतत समाजासाठी अहोरात्र झटणारे बहुतांश पत्रकार वेळेवर स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळी किरकोळ व्याधी अथवा आजारांकडे दुर्लक्ष होत जाते. त्याचे वेळेवर निदान केले जात नाहीत.त्यामुळे मोठे आजार वाढण्याची शक्यता असते.या परिस्थितीची जाणीव ठेवत पहिल्यांदाच चाळीसगाव बापजी जीवनदीप हॉस्पिटलच्यावतीने डॉ. संदीप देशमुख व त्यांचे मित्र परिवारातील तज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांसाठी राबविलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम प्रेरणादायी असल्याच्या भावना ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी व्यक्त केल्या. डॉक्टरांनी राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुकही केले. पत्रकारांनी आपले संघटन वाढवून आर्थिक सक्षमीकरणावर देखील भर द्यावा सल्ला त्यांनी यावेळी दिला.त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्यासह आपल्या…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यात असलेल्या ‘सम्मेदशिखर’ तसेच गुजरात राज्यातील ‘शत्रुंजय तीर्थ’ (पालिताना) अर्थात गिरनार या ठिकाणी संबंधित सरकारतर्फे पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले असून झारखंड राज्यातील सम्मेदशिखर येथे वीस तीर्थकारांची मोक्षस्थळी असून समस्त जैन समाजाचे आस्थेचे केंद्र आहे. झारखंड राज्याने पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांमूळे मांस, मद्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तरी जैन समाज अनादीकाळापासून अहिंसेचा पूजारी असून अशा पवित्र स्थळाची पावित्र्यता नष्ट होईल हे विश्वातील जैन समाजास मान्य नाही. ही बाब लक्षात घेता संबंधित राज्य सरकारने अध्यादेश त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज चाळीसगाव जैन समाजाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालय…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी राज्यस्तरीय चौथी मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा व मिनी ऑलम्पिक पात्रता स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत प्रथम धावणे नंतर शूटिंग व जलतरण असे तीन प्रकार होते. या स्पर्धेत पोलीस जलतरण तलाव येथील आठ जलतरणपटू यांनी भाग घेऊन यश मिळवले. स्पर्धेसाठी निवड झालेले 19 वर्षाखालील मुले :- तलाह सिद्दिकी चौथ्या स्थानी, अमेय नगरकर पाचव्या स्थानी, हर्षवर्धन महाजन आठव्या स्थानी, आयान शेख नव्या स्थानी., 19 वर्षाखालील मुली :- धनश्री जाधव पाचव्या स्थानी.,17 वर्षाखालील मुले :- ओम चौधरी तृतीय स्थानी ., 17 वर्षाखालील मुली :- लाजरी खाचणे चौथ्या स्थान, जानवी महाजन पाचव्या स्थानी. सर्व जलतरणपटू यांची पुढील…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव पोलीस ठाणे सोयगावच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त पोलीस बांधवांच्या वतीने श्रमदान करून सोयगाव पोलीस ठाणे व परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार,पोलीस उपनिरीक्षक पंडित यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून सोयगाव पोलीस ठाणे तसेच परिसरात श्रमदान करून संत गाडगेबाबा महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले.
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी : तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड जाहीर झाल्या आहे त्या पैकी कोल्हाडी ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस ने आपला झेंडा फडकवला आहे. पुंजाजी दशरथ पाटिल हे विजयी.धोंडखेडा लोकनियुक्त सरपंच साठी वैशाली सागर दांडग़े राष्ट्रवादी .चिचखेड़ अक्काबाई नंदू पाटील विजयी राष्ट्रवादी.नीमखेड़ रमेश सुखदेव सुरंगे राष्ट्रवादी. या आधी वडजी येथे अलकाबाई विश्वास खाचणे,राष्ट्रवादी या बिनविरोध झाल्या होत्या.
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना एनडीआरएफच्या तज्ज्ञांकडून मिळणार्या प्रशिक्षणाचा फायदा समाजाला होणार असून भविष्यात आपत्ती आली तर उद्भवणार्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी ही युवा शक्ती सज्ज राहील असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्रविद्यापीठात आज सोमवार दिनांक १९ डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन समारंभात श्री. कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणालीव्दारे मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर, आव्हान शिबिराच्या…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी मानेवाडी:- तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतसाठी रविवारी दि. १८ रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मौजे मानेवाडी गावचा समावेश होता. या निवडणुकीमध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास पॅनेलने ८ जागेपैकी ४ जागेवर विजय मिळवला आहे. तर संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनल ४ जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये जय मल्हार ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाच्या विजयी उमेदवार नेहरू दशरथ बंडगर, तर सदस्य पदासाठी विजयी उमेदवार बालाजी बापूराव लकडे, शहाजी ज्ञानोबा हक्के, सुवर्णा लहू सगट, यांचा समावेश आहे. संत मारुती महाराज ग्रामविकास पॅनलमध्ये अर्चना भीमराव टकले, रेखा चंदू देवकर, बिरु धोंडिबा माने, शांताबाई…