साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी दुसखेडा ता.यावल येथील तकारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू द्यायचा नसेल तसेच तक्रारदाराविरुद्ध नाशिक येथे जे अपील करणार आहेत सदर अपीलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष 20,000/-रु.लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पैकी 10,000/-लाच रक्कम स्वतः पंचासमक्ष शशिकांत नारायण साळवे, वय-54, सहाय्यक सहकार अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जळगाव वर्ग-3 रा.मंगलमुर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ, जळगाव यांनी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांनी सन 2013 मध्ये दुसखेडा ता.यावल येथील गट क्रं.१६५ मधील ९७ आर इतकी…
Author: Saimat
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझर शहर तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ओझर शहरातील श्री संताजी मंगल कार्यालय येथुन रथावर जगनाडे महाराज यांची प्रतिमा व भव्यदिव्य मुर्तीची समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली, प्रारंभी मारुती वेशी पासुन शिवाजी चौक, मेनरोड, प्रियदर्शिनी शाँपिंग सेंटर ,महात्मा फुले चौक ,भगवा चौक,तांबट गल्ली, माधवराव पहिलवान चौक, मल्हार चौक, चाँदनी चौक, राजवाडा ,तेली गल्ली ,महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद रोड, तानाजी चौक येथुन मिरवणूकीची सांगता करण्यात आली. श्री संताजी महाराज मंगल कार्यालय येथे किर्तन भोलेहर भजनी मंडळ यांनी सादर करीत, श्री संताजी महाराज…
साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी सर्वसाधारण शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पादन घेतले. परिसरात एकरी सरासरी ७० ते ७५ टन उत्पादन घेतले जाते. पण या सरासरीच्या गणिताला बगल देत चिंचोली भुयार, ता. उमरगा येथील प्रयोगशील शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पन्न घेतले. अमर पवार यांना वडिलोपार्जित २० एकर शेती असून शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी वकिली व्यवसायाला राम-राम ठोकत शेत व्यवसाय करण्याचा छंद बांधला. या वर्षी साखर कारखान्याचे बायलर पेटल्यानंतर ऊसतोड सुरू झाली आणि अमर पवार यांनी एकरी १०४ टन ऊस काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी एकरी ७० ते ७५…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.८ गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव शहरातील पंचायत समिती आवार,व छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक परिसर,सोयगाव न्यायालय परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार,व सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनाजी खंदारे,डॉ.आबेद शेख,सोयगाव होमगार्ड पथाकाचे प्रभारी प्रमुख कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे सह आदी. होमगार्ड यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.तसेच यावेळी सोयगाव न्यायालयाचे न्यायाधीश अमोल इंगोले यांनी होमगार्ड वर्धापन दिनाच्या होमगार्ड संघटने विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी – फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) व अॅग्रोवर्ल्डच्यावतीने शेतमाल निर्यात संधी या विषयावर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी पत्रकार भवन येथे बुधवारी (ता. 7) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी विनामूल्य होती. आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत आमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला, असा सूर शेतकर्यांमध्ये उमटला. शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा महाव्यवस्थापक चेतन पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, कनिष्ठ सहाय्यक संचालक निकेतन भोसले, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी तालुक्यातील निंबायती येथील शेतकरी पुत्र गणेश कौतिक सुस्ते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल निंबायती येथील कै. वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय येथे सत्कार करण्यात आला गणेश सुस्ते यांचे दहावी पर्यतचे शिक्षण हे याच विद्यालयात झाले. सत्कार प्रसंगी कै.वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक यशवंत चौधरी यांच्यासह विलास चौधरी,समाधान शेळके,संजय पाटील,दिनेश पाटील,लिपीक गजानन राठोड,सेवक ज्ञानेश्वर तेली, बेबीबाई राठोड , व विद्यार्थी उपस्थित होते.
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायत दिनांक 07 रोजी बिनविरोध जाहीर करण्यात आली , यावेळी गावाच्या ऐकी मुळे हा ऐतिहासिक निर्णय ठरला, यावेळी पुढीलप्रमाणे विजयी उमेदवार लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , हिरालाल ढाकरे , गोरख पवार , शाम पाटील , सुनिता उबाळे, निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे अशाप्रकारे बिनविरोध निवड करण्यात आली , यावेळी गावातील उपस्थित चेअरमन देविदास राजपुत , तालुका प्रमुख दिलीप मचै , माजी सरपंच शिवदास राजपुत , रविंद्र पाटील, प्रविण कदम, ईश्वर श्रीरसागर, तिरुपती पतसंस्था चेअरमन रामदास राजपुत, भगवान राजपुत, संदीप गायकवाड,मोतीलाल वाघ , विठ्ठल बडकणे,संतोष राजपुत,जयेश पाटील ,किरण पाटील…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे अपेक्षेप्रमाणे इच्छुकांची संख्या पाहता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते त्यामुळे आता माघारींनतर सर्वच चित्र स्पष्ट झाले असून एकूण ८५ दाखल अर्जांपैकी एकूण ४४ अर्ज माघार झाल्याने व एक अर्ज पात्र निकषात न बसल्याने व एक जागा बिनविरोध झाल्याने आता सतरा जागेसाठी चाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर कजगाव लोकनियुक सरपंच साठीची निवडणूक चौरंगी होणार आहे. कजगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे पहिलेपासूनच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण बारा उमेदवारांनी अर्ज भरले होत मात्र आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक आता चौरंगी होणार…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी बोदवड महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या 45 विद्यार्थ्यांनी नुकतीच अजिंठा लेणीला भेट दिली.या भेटीत विद्यार्थ्यांनी लेण्यांमधील अद्भुत सौंदर्य , चित्रे व शिल्पांच्या निरीक्षणासोबतच गणित,विज्ञानाच्या दृष्टीकोनातूही लेण्यांचा अभ्यास केला . त्यातून त्यांना आढळले की अजिंठालेणी दीर्घकाळ टिकावी , छताचे वजन पेलता यावे म्हणून एकसंध उत्कृष्ट घनता असलेल्या अश्या बेसाल्ट खडकात लेणी कोरतांना विविध स्तंभ,वेगवेगळे दरवाजे, निरनिराळया खिडक्या, हवेचे झरोखे, त्यांची संख्या,त्यांचा आकार ,त्यांची उंची, त्यांची जाडी ,स्तंभावरील दाब,वजन ,बल लक्षात घेऊन केलेली प्रमाणबद्धता घेतांना सखोल विचार केलेला आढळतो . तसेच लेणीमध्ये प्रकाश आत यावा ,हवेचे वायुविजन व्हावे ,योग्य तापमान राहावे ,पावसाच्या पाण्याची साठवण, यासांरख्या गोष्टींच्या त्याकाळात केलेल्या उपाययोजना बघून…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुका हा १००% डोंगरीभाग असल्याने हा तालुका सोयगाव सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जोडला गेला आहे तसेच या मतदारसंघासाठी दोन आमदार व दोन खासदार आहेत तरी त्या दृष्टीने सोयगाव तालुका विकासापासून कोसो दूर आहे, तसेच जिल्हा परिषदेचे तीन सदस्य असून एकूण सहा पंचायत समिती गण आहेत १/५ सर्कल कन्नड मतदार संघ,१/५ सिल्लोड मतदार संघ असल्यामुळे जि. प. सदस्यांचा निधी देखील खर्च करण्यास मतदारसंघात अडचण येत असते त्यामुळे विकासकामांना अडथळा येत असतो याप्रकारे तालुक्यातील परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाला देखील अडचणीचा सामना करावा लागतो. तरी सोयगाव तालुका हा एकाच विधानसभा मतदारसंघात जोडावा अन्यथा पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा…