साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी शहर व तालुक्यात सद्या अवैध वाळू वाहतुकीने जोर पकडला आहे. यावर अंकुश लागावा म्हणून रात्रभर महसूल प्रशासनाचे गस्ती पथक संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असते. याचाच परिणाम म्हणून आज पहाटे पावणे सहा वाजता कारगील चौकातून शहरात प्रवेश करतांना एका अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॕक्टरचा पाठलाग करत असतांना वेगात असलेले ट्रॕक्टर ट्रॉलीसह महावीर नगर नजीक पलटी झाले. ही घटना इतकी भयंकर होती की, या मध्ये टॕक्टर व ट्रॉली यांची चाके निघून पडली होती. व ट्रॉलीमधील वाळू रस्त्यावर पसरली. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पथकातील तलाठी संतोष कोळी हे किरकोळ जखमी झाले. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात नेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी मलकापूर येथील रेल्वे लाईनचे काम करणारा ३२ वर्षीय खासगी कंत्राटदाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सकाळी कि.मी ४९२/३२ बाय १५ च्या मध्यभागी मेन डाऊन लाइनच्या बाजूला मलकापूर येथे घडली. मृत पावलेला खासगी ठेकेदार सुनील उद्रास कंगाले (रा. भातोडीया खुर्द, जिल्हा छिंदवाडा) हा सकाळी मलकापूर रेल्वेलाईन येथे काम करत असताना माघुन येणारी भरधाव रेल्वेचा आवाज आला नाही. त्यामुळे रेल्वे क्रमांक १२८७८(गरीब रथ) या धावत्या गाडीची धडक लागून गंभीर जखमी होऊन तो जागीच मरण पावला. याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी व पंचनामा केला. मृतदेह हा मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता…
साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी तमाम भारतीयांच्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी भारतीय समाजातील जात, धर्म, वर्ग, लिंग, आदी भेदांमध्ये अडकलेल्या समाजातील दरी नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. खऱ्या अर्थाने मानवाच्या, माणुसकीच्या प्रस्थापनेसाठी अहोरात्र काम केले, लेखन केले. संविधानाचे निर्माण आणि लोकशाहीसाठी आग्रही राहून, न्याय, समता, समाज परिवर्तन, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी समाज परिवर्तनाची…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी येथील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोयगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक तथा शहर प्रमुख संतोष बोडखे,हर्षल काळे,गजानन कुडके, राजू दुतोंडे,लतिफ शहा, अमोल मापारी, संदीप सुरडकर, कदीर शहा, मंगेश सोहणी, किशोर मापारी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.
साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री झाला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी साखर आयुक्त, कामगार आयुक्त, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक तसेच कारखान्याचे प्रशासक, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. मात्र या विषयी कोणताही विचार न करता जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री केला. कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी मधुकर कारखान्याच्या सर्वच कामगारांची बैठक घेण्यात आली. त्यात कारखाना विक्री केल्यानंतर कामगारांची प्रलंबित देणी अद्यापही मिळाली नाही. त्याबाबत कामगारांशी कोणतीही चर्चा केली नाही. कामगारांना विश्वासात घेवून निर्णय व्हायला पाहिजे होते. कामगारांची…
साईमत लाईव्ह जरंडी प्रतिनिध राष्ट्रनिष्ठा ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली.अशा विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी जरंडी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना व त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले यावेळी सिद्धार्थ मोरे,सुरेश चनाल, अशोक सावळे,सोपान मोरे,संतोष मोरे,सिद्धार्थ दांडगे,मधुकर सोनवणे,प्रदीप जगताप,संतोष मोरे,भिका शिंदे,ज्ञानेश्वर मोरे,रमेश मोरे, त्र्यंबक मोरे,यशवंत कोतकर,प्रकाश मोरे,नामदेव साळवे, राहुल दांडगे, सागर साळवे, यांच्या सह इतर बौद्ध समाज महिला भगिनी व बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासन तर्फे विद्यार्थ्यांच्या सुदृढ व तंदुरुस्त शरीरासाठी विविध योजना राबवत असताना त्याच उद्देशाने क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. हॉकी स्पर्धांमध्ये मिल्लत हायस्कूल, मेहरूण, जळगावच्या संघाने बाजी मारली मागील परंपरा कायम ठेवत यंदाही विजयी पदक पटकावले. अँग्लो उर्दू हायस्कूल सोबत चुरशीच्या स्पर्धेनंतर बाजी मारली. मिल्लतच्या या संघात इयत्ता 10वी (ब) च्या विद्यार्थ्यांमध्ये उमर शेख नईमुद्दीन, जोहैब झाकीर हुसेन, मंजर सय्यद अलीम उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांना शाळेतर्फे पारितोषिक देण्यात आले. क्रीडा शिक्षक मुख्तार सय्यद यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मिल्लत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद रफिक शाह सर, इतर विश्वस्तांसह शिक्षिका अफिफा शाहीन मॅडम, पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये, पूर्व प्राथमिक विभागात “आजी-आजोबा मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आजी आजोबांचे स्वागत ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून व त्यांनी स्वहस्ते बनवलेले ग्रीटिंग कार्ड देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अरविंद मार्तंड देशपांडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, माध्यमिक विभागाच्या समन्वयिका संगीता तळेले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आजी-आजोबांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख नीलिमा शुक्ला होत्या. त्यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्तविकेनंतर आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात फुंकर मारून कप उडवणे, तसेच प्रश्न उत्तरांचा खेळ…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सध्याचे युग दिवसेंदिवस प्रगती करीत असले तरी अद्यापही दिव्यांगत्व रोखणे शक्य नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने जन्माच्या अगोदरपासून अपंगत्व कळते. वेळीच उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगत्व रोखणे किंवा कमी करणे शक्य होते. उडानच्या प्रारंभिक बालविकास केंद्राच्या माध्यमातून हे पुण्यकर्म शक्य होईल, असे प्रतिपादन दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान प्रारंभिक बालविकास केंद्राचे लोकार्पण जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी, सोयो सिस्टीमचे किशोर ढाके, के.के.कॅन्सचे प्रमुख रजनीकांत कोठारी, लेवा भातृ…
साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील पैलवान दामू सहदेव वाकोडे याने महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर विजय मिळवला त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. दामू वाकोडे हा कुस्तिगिर मल्ल अनेक दिवसांपासून कुस्त्यांचे आखाडे गाजवत असतो त्याने आता पर्यंत अनेक ठिकाणी विजय मिळवला शालेय स्तरावरील अनेक कुस्त्या त्याने जिंकल्या आहेत. तसेच यापूर्वी अनेक मानाच्या कुस्त्या त्याने जिंकून विजयश्री खेचून आणला आहे. आता त्याने महाराष्ट्र केसरी ची तयारी चालू केली आहे त्यात त्याने महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निवड स्पर्धेत यश मिळवले व जिल्ह्यातून त्याची व अन्य स्पर्धकांची निवड झाली आहे. त्यामुळे आता दामू वाकोडे हा महाराष्ट्र केसरीच्या तयारीला लागला…