ओझर शहर श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

0
1

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी

ओझर शहर तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ओझर शहरातील श्री संताजी मंगल कार्यालय येथुन रथावर जगनाडे महाराज यांची प्रतिमा व भव्यदिव्य मुर्तीची समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली, प्रारंभी मारुती वेशी पासुन शिवाजी चौक, मेनरोड, प्रियदर्शिनी शाँपिंग सेंटर ,महात्मा फुले चौक ,भगवा चौक,तांबट गल्ली, माधवराव पहिलवान चौक, मल्हार चौक, चाँदनी चौक, राजवाडा ,तेली गल्ली ,महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद रोड, तानाजी चौक येथुन मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

श्री संताजी महाराज मंगल कार्यालय येथे किर्तन भोलेहर भजनी मंडळ यांनी सादर करीत, श्री संताजी महाराज यांच्या पुरातन ओव्या व अभंग सादर करीत संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात डुंबून गेले होते, आरती व पूजन माजी जि प सदस्य यतीन कदम व माजी ग्रा स सुनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली .

ओझर मर्चंट बँकेत निवडून आलेल्या प्रविण वाघ, गणेश बोरस्ते तसेच तैलिक महासभेच्या युवा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नितीन महाले यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार अध्यक्ष रमेश बोरस्ते, अरूण गणोरे, सुनिल कर्पे, संतोष सोनवणे, केशव वाघ यांच्या हस्ते करण्यात आला,तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी रुपाली सोनवणे, अनुराधा गणोरे, स्नेहा थोरात, वृषाली बोरस्ते, कोशल्या कर्पे, संगिता व्यवहारे, सविता कर्पे, भारती वेताळ, वैशाली लुटे, सुवर्णा कोरडे,ज्ञानेश्वर कर्पे, हिंमतराव चौधरी, रामदास मोरे, मनोज सुर्यवंशी,सुरेश चौधरी,सौरभ व्यवहारे ,अक्षय गणोरे,विराज गांगुर्डे,ओमकार वाघ,आदित्य वेताळ ,राम बोरस्ते,दर्शन मोरे ,विशाल सोनवणे आदींसह असंख्य समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here