विकासकामांच्या प्रस्तावांना मोगरी लावणाऱ्या नाशिकच्या मुख्य अभियंत्याच्या कारनाम्यांचा हिवाळी अधिवेशनात वाचणार पाढा

0
1

साईमत लाईव्ह जळगाव विशेष प्रतीनिधी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता औटी यांच्याकडे जळगाव विभागातून मंजुरीसाठी गेलेल्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी कागदपत्रे पाठविली जातात. या कामांच्या प्रस्तावातील  सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कामांना मंजुरी न देता विकासाला अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा अजब प्रकार मुख्य अभियंता  औटी (नाशिक) यांच्याकडून होत आहे. त्यातल्या त्यात विरोधी पक्षाचे आ. अनिल भाईदास पाटील यांच्या आर. बी. पाटील फर्मच्या कामांना मात्र मजुंरी दिल्याने मुख्य अभियंता औटी यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना डिवचल्याच्या कार्यशैलीची चर्चा मात्र रंगली आहे. मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यशैलीने संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री ना. गिरीष महाजन  यांनी या गोंधळाची दखल घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

दरम्यान , याबाबत जळगाव शहराचे भाजपाचे आ. राजूमामा भोळे यांनी ‘साईमत’शी बोलतांना सांगितले की, 19 डिंसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सूरू होत आहे. या अधिवेशनात विशेष लक्षवेधी मांडून  मुख्य अभियंता  औटी यांच्या कारनाम्यांचा जाब विचारणार आहे. ते म्हणाले की, या महाशयांनी मनपा हद्दीतील जनतेच्या मुलभूत विकासकामांच्या प्रस्तांवाना अडवत ते जनतेच्या हिताच्या आड आले आहेत. याचा जाब आम्ही  अधिवेशनात विचारणार आहोत. जळगाव शहर जागोजागी खोदून पडले आह अशा परिस्थितीत पायाभूत विकासकामे मार्गी लावणे आवश्‍्यक असतांना मुख्य अभियंता औटी खोडा घालत आहेत, असेही आ.भोळे म्हणाले.
आ. किशोर पाटील यांनी ‘साईमत’शी बोलतांना सांगितले की, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विशेष लक्षवेधी मांडून  मुख्य अभियंता  औटी यांचा  विकासकामांच्या प्रस्तावातील आमदारांच्या कामांना मंजुरी न देता विकासाला अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा प्रकार सभागृहासमोर आणणार आहे. विकास कामांचे प्रस्तांव अडकल्याने मतदारसंघात विकास कामे खोळंबली असून याचा जाब हिवाळी अधिवेशनात विचारला जाईल असेही त्यांनी आक्रमकपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here