Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी पावसाच्या सरींच्या वर्षावातही भाविकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या जयघोषासह टाळ, चिपळ्यांचा निनादाने गुरुवारी (दि. 29) साजरा झालेल्या रथोत्सवामुळे अवघी पिंप्राळानगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरात गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंप्राळा नगरीत विठ्ठल मंदिर संस्थानच्या 148 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ‘माऊली..माऊली’ चा जयघोष ऐकायला…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील अतिक्रमण हटविण्यात येवून तेथे ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या रस्त्यावर नाश्तापाण्याच्या गाड्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. सायंकाळी खासगी बसेस जागा अडवून ठेवतात. त्यामुळे हा रस्ता ‘नो हॉकर्स झोन करणे गरजेचे असल्याने महापालिकेने तसा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच अमृत 2.0चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव पुन्हा महासभेत सादर करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी महासभेने अमृत 2.0 चा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा ठराव केला होता. परंतु मुंबई येथील शहा टेक्निकल कन्स्ल्टंट मुंबई यांनी असमर्थता दर्शविल्यामुळे आता पुन्हा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला आहे. दि.7 जुलै…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली.तसेच पहिल्या टप्प्यात जळगाव होईल. जिल्ह्यातील 460 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च येईल. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गाव निवड समिती स्थापन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4 हजार 682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 अशा एकूण 5 हजार 220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.…

Read More

साईमत छ. संभाजीनगर प्रतिनिधी जळगावातील एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. या मुलीचं वय अवघे पंधरा वर्ष असून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ही मुलगी एका तरुणासोबत राजस्थानात सापडली. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आले.  तिच्या आईने उच्च न्यायालयात गर्भपाताची परवानगी मिळवण्साठी याचिका दाखल केली. पण खंडपीठाने यास स्पष्ट नकार दिला. गर्भपात करण्यास परवानगी का नाकारली? वैद्यकीय तपासामध्ये या मुलीच्या उदरात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिच्या आईने जळगावमधील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यास परवानगी मिळावी अशी याचिका उच्च…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मुख्यामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शाशन आपल्या दारी या कार्यक्रमात दिलेल्या जवाबदारीमध्ये हलगर्जी झाल्या प्रकरणी एसटी महामंडळाच्या खुशाल मोरे अश्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भगवान जगनोर विभाग नियंत्रक यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती दिली . या कारवाईची चर्चा महामंडळात कालपासून सुरु आहे. एकनाथ शिंदे हे राज्यचे मुख्यामंत्री व परिवहन विभागाचे मंत्री असून ते मंगळवारी शाशन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त जळगाव शहरात आले होते. या कार्यक्रमात मोरे यांच्या नियोजनाची जवाबदारी देण्यात आली होती. मात्र मोरे हे कामावर त हजर झाले पण आपल्याला सोपवलेली कामे न करता तेथून निघून गेले . नियोजनाचा आढावा घेत असताना त्यात मोरे हे…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. त्यासाठी 4 हजार 365 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) होते. पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली मात्र सोबत असलेल्या इतर दोन महिलांची ओळख पटलेली नव्हती. अखेर त्या दोघांची ओळख पटली असून ते दोघे मायलेकी निघाल्या आहेत. गायत्री प्रविण कुळकर्णी (वय-34) आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी (वय-11) दोन्ही (रा. शिवाजी नगर, जळगाव ह.मु.बडवाणी मध्यप्रदेश) असे मयत झालेल्या दोन्ही मायलेकीचे नाव असून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीचा ताबा सुटल्याने झाला अपघात सोमवारी 26 जून रोजी जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ भीषण अपघात झाला होता. महेश…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर बुधवारी कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जून ते 28 जून या कालावधीत जिल्ह्यातील अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 31 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केली. कारवाई केलेले संबंधित वाहने ही तालुक्याच्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये वाळू वाहतूक करणारे 17 डंपर, 17 ट्रॅक्टर्स, तीन टेम्पो आणि 1 ओमनी व्हॅन अश्ाा वाहनांचा समावेश आहे. यासंदर्भात जळगाव तालुक्यात गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,…

Read More

साईमत भडगाव प्रतिनिधी  येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात (Indian Army) नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (३४) हे भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना शहीद झाले त्यांच्या आकस्मित दु:खद घटनेने माळी परिवारावर मोठा आघात झाला असून यामुळे गावावर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानाबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यासाठी त्याचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून त्यांचे शुक्रवारी सायंकाळ पर्यंत गुढे या मुळ गावी येण्याची शक्यता आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आषाढी एकादशी ‌‘निमित्त विठुरायाच्या पालखी मिरवणूक तसेच चिमुकल्यांच्या हस्ते विठ्ठल विठ्ठल …नामच्या गजराने दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत,पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच लाडक्या विठुमाऊलीच्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपरोक्त सोहळा दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.आर्या खलाणे,जीनल अग्रवाल व गीता नन्नवरे या विद्यार्थीनिनी केली. ई. 3 री च्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. याप्रसंगी पोदार स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री शारदा स्तवन व विठुल-रुक्मिणी प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी आषाढी एकादशी ‌‘निमित्त शुभेच्छा…

Read More