Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच ता. १ जुलै रोजी मणिपूर येथून निवृत्त झाले. याप्रसंगी ता. २ जुलै रविवार रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण, नगरसेवक कुंदन काळे, नवयुवक मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय मराठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन सरोदे हे उपस्थित होते. श्री. शिवाजी शिंदे यांचे ता. २ जुलै रविवार रोजी सकाळी ७ वाजता…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्याच्या हरोबर राष्ट्रवादी चे बडे नेते ही सरकार मध्ये गेल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे . सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होत आहे. राजभवनामध्ये अजित पवार दाखल झाले. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. काही वर्षांपूर्वी राजाच्या राजकारणात अशाच प्रकारचा भुकंप झाला होता. त्यात पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी देखील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या या नव्या खेळीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारण्यात आले…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न वाळू चोरीचा असल्याने यासंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत. जनतेसाठी आता 9209284010 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून या क्रमांकावर वाळू चोरीसह अन्य तक्रारी जनतेने पुराव्यासह तक्रार केल्यास तत्काळ तक्रारींचे निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथे दिली. शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी त्यांनी बैठक घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, वाळू चोरट्यांवर प्रशासन सातत्याने कठोर कारवाई करीत आहे. शिवाय वाळू चोरट्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या चल-अचल संपत्तीसह बँक खात्यावर बोजा बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वस्तात वाळू देण्याचे शासन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मजुरीचे पैसे घेण्याच्या कारणावरून दुकान मालकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी आरोपी दीपक मधुकर दुसाने (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एन. खडसे यांनी दोन वर्ष सक्तमजुरीची आणि 2 हजारांचा दंड अशी शिक्षा शनिवारी 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील वाघ नगर परिसरात सागर शंकर भामरे यांचे वाघ नगर स्टॉप येथे साईदर्शन फेब्रीकेशन वेल्डींग दुकान आहे. या दुकानावर आरोपी दीपक दुसाने हा कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडले होते. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता दीपक दुसाने हा दुकानावर आला. त्याने सागर भामरे यांना कामचे राहिलेले पैसे मागितले. त्यावर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला. कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtawadi Congress) पक्षात मोठे बदल केले जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरविण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली आहेत. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावर प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान जर तुमच्या वाट्याला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मुख्यमंत्री पदाला एकतर पुरुष अथवा महिला असा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी १ जूलै रोजी सकाळी ११ वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांच्या उपस्थितीत जवळपास १५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे म्हणून तक्रार निवारण दिन ही संकल्पना राबविण्यात येते. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी जळगाव शहरात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. यात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी नुसार त्यांना तक्रार निवारण दिनाचे दिवशी बोलावण्यात येते. त्यावेळी अर्जदार आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे अशा दोघांना बोलावण्यात येते. यात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेवून त्या…

Read More

साईमत बोदवड प्रतिनिधी राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे जळगाव जिल्ह्यातील बर्याच तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला आहे परतु बोदवड तालुक्यात अद्यापही पाउस नाही जवळपास १००%धुळ पेरनी पूर्ण झाली आहे परंतु शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे. दराम्यान, बोदवड परिसरात शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट उभे ठाकले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. कायम स्वरूपी दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यात वरुण राजाने  सुद्धा पाठ फिरवली कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर असुन, पिण्यास सुद्धा पाणी मिळत नाही गुराढोराना चारा नाही शेतमजूराच्या हाताला काम नाही बाजार पेठ सुन्न असून शेतकरी चिंताग्रस्त आहे . शेतकरी नाना पाटील यानी सागीतले की,…

Read More

साईमत मलकापूर प्रतिनिधी ढाब्यावर दारू पिवून ढाब्याशेजारी असलेल्या जनरल स्टोर मालकास सिगारेट उधार मागून उधार न दिल्याच्या रागातून 10 ते 15 लोकांनी एकास बेदम मारहाण करून तेथून पळ काढल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास वडनेर धानोरा दरम्यान महामार्गावरील फिरोज च्या ढाब्यावर घडली. मलकापूर ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर वडनेर ते धानोरा दरम्यान असलेल्या फिरोजचा ढाबा असून तेथे धानोरा येथील अनंता कोल्हे हा युवक जनरल स्टोर आणि पानपट्टी व्यवसाय करतो. शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास तेथे 10 ते 15 लोक जेवण करण्यासाठी आले होते त्यापैकी काहींनी मद्यप्राशन केल्याचीही माहिती असून त्यापैकी काहींनी शेजारील अनंता कोल्हे यांच्या पानपट्टीवर जाऊन सिगारेट मागितली सिगारेट…

Read More

साईमत बुलढाणा प्रतिनिधी नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. आधी लोखंडी खांबाला धडकून बस संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर आठ प्रवासी बालंबाल बचावले. परंतु हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काही जणांनी केला आहे. डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका व्यक्तीने सांगितलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ३३…

Read More