साईमत जळगाव प्रतिनिधी
पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आषाढी एकादशी ‘निमित्त विठुरायाच्या पालखी मिरवणूक तसेच चिमुकल्यांच्या हस्ते विठ्ठल विठ्ठल …नामच्या गजराने दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत,पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच लाडक्या विठुमाऊलीच्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपरोक्त सोहळा दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.आर्या खलाणे,जीनल अग्रवाल व गीता नन्नवरे या विद्यार्थीनिनी केली. ई. 3 री च्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले.
याप्रसंगी पोदार स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्री शारदा स्तवन व विठुल-रुक्मिणी प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी आषाढी एकादशी ‘निमित्त शुभेच्छा दिल्या. संत, महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला भक्ती मार्गातून समाजप्रबोधन करण्याचे काम वारकरी पंथाने केले आहे याची आठवण आपण ठेवावी तसेच संतांच्या शिकवणुकीला नित्य व्यवहारात आचरणात आणावे असा आग्रह केला.
दरम्यान कु.ऋषिका ढाके वारकरी संप्रदायाची पुरातन परंपरा व त्याचे अनन्यसाधारण महत्व विद्यार्थ्यांसमोर आपल्या भाषणातून स्पष्ट केले. चिमुकला विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत अभंग सादर करून उपस्थिताची मने जिंकली. पोदार स्कूलचे शिक्षक निलेश चव्हाण यांनी यावेळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना संबोधित केले. सामाजिक ऐक्य व संस्कृती रक्षणासाठी संतांचे अमूल्य योगदान आहे म्हणून विद्यार्थ्यांनी संतसाहित्याचा अभ्यास करावा असे मत मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपप्राचार्य दीपक भावसार मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ,प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे,वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.